चंद्रपुरात एक वीज कोसळली अन् 26 शेळ्या जागीच ठार, मायबाप सरकार मदत करा, शेळीपालकाची मागणी

| Updated on: Oct 01, 2021 | 8:45 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव शिवारात वीज कोसळून तब्बल 26 शेळ्या ठार झाल्या आहेत. या धक्कादायक घटनेनंतर शेळ्यांचा मालक धाय मोकलून रडत आहे. अचानकपणे तब्बल 26 शेळ्या जागीच मेल्यामुळे काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलाय.

चंद्रपुरात एक वीज कोसळली अन् 26 शेळ्या जागीच ठार, मायबाप सरकार मदत करा, शेळीपालकाची मागणी
GOAT CHANDRAPUR
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव शिवारात वीज कोसळून तब्बल 26 शेळ्या ठार झाल्या आहेत. या धक्कादायक घटनेनंतर शेळ्यांचा मालक धाय मोकलून रडत आहे. अचानकपणे तब्बल 26 शेळ्या जागीच मेल्यामुळे काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलाय. या शेळीपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने मला मदत करावी अशी मागणी त्याने केली आहे.

अचानकपणे वीज कोसळल्यामुळे 26 शेळ्यांचा जागीच मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या नवरगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात विजा कडाडत असल्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान आलेसूर गावातील परिसरात एक वीज पडल्याची घटना घडली. ही वीज तब्बल 26 शेळ्यांच्या अंगावर पडली.

सुदैवाने राखणदाराचे प्राण वाचले 

ज्या ठिकाणी वीज कोसळली तिथे  शेळीपालक 100 पेक्षा अधिक शेळ्या चरायला घेऊन गेला होता. यातील 26 शेळ्यांवर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने जोराचा पाऊस असल्यामुळे शेळ्यांचा राखणदार सुरक्षित स्थळी गेल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

चंद्रपूर शहरात अंगावर वीज कोसळल्याने तरुणाचा मृत्यू

चंद्रपूर शहरातच वीज पडून आज एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील बसस्थानकासमोरील इमारतीवर ही घटना घडली. अनिकेत चांदेकर असं मृत युवकाचं नाव आहे. आज दुपारी तो त्याच्या काकासोबत  सीसीटीव्हीचे केबल टाकण्याचे काम करत होता. यावेळी अंगावर वीज कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 100 शेळ्यांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात 10 सप्टेंबर रोजी असाच एक प्रसंग घडला होता. वीज कोसळल्यामुळे येथे तब्बल 100 मेंढ्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील सावली येथे राजस्थान तसेच गुरजारतचे मेंढपाळ मुक्कामी होते. त्यांनी सोबत बऱ्याच मेंढ्या आणल्या होत्या. सावली हा भाग दुर्गम आणि जंगलाचा असल्यामुळे हे मेंढपाळ येथेच राहतात. गडचिरोली जिल्ह्यात 8 ते 10 सप्टेंबर या काळात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. पावसादरम्यान वीज कोसळल्यामुळे ही घटना घडली होती. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे तंबूमध्ये असलेल्या तब्बल शंभर मेंढ्या व दहा बकऱ्या जागीच ठार झाल्या होत्या. या घटनेत मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले होते.

इतर बातम्या :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

(chandrapur 26 goats died due to lightning strike)