चंद्रपूर: जिल्ह्यातील भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसी झाल्या खराब झाल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्याकडून खराब झालेल्या लसींची किंमत वसूल करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे उघडकीस आला होता प्रकार, कोरोना प्रतिबंधक लसी अतिथंड झाल्याने गोठल्या होत्या. केंद्रातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने चुकीची कबुली दिली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या आरोग्य केंद्रावर 2700 लसी वाया गेल्याच्या प्रकरणात एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. आरोग्य सहायक शीला कराळे असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 13 ऑक्टोबर रोजी या केंद्रावरील 2600 कोविशील्ड आणि 100 कोवॅक्सीन लसी डीप फ्रीझर मध्ये ठेवण्यात आल्यामुळे खराब झाल्याची बाब उघड झाली होती. ही बाब उघड होताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी केली आणि त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्याकडून खराब झालेल्या लसींची किंमत वसूल करण्याची कारवाई देखील कऱण्यात येणार आहे. प्रशासनाला यासंदर्भातील अहवालाची प्रतीक्षा आहे.
भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी आरोग्य केंद्र असून तिथं हा प्रकार घडला होता. लसी डीप फ्रीझ केल्याने झाल्या खराब झाल्या होत्या प्रशासनाने वाया गेलेल्या लसींची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. कामाच्या अति ताणाने चूक झाल्याची कर्मचाऱ्यांची कबुली दिली होती. तब्येत बरी नसल्याने ही चूक झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने मान्य केले आहे.
इतर बातम्या:
‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात
Chandrapur 2700 corona vaccine wasted due to deep cooling nurse suspended by administration