चंद्रपूर: जिल्ह्यातील भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसी झाल्या खराब झाल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबित कर्मचाऱ्याकडून खराब झालेल्या लसींची किंमत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे उघडकीस आला होता प्रकार, कोरोना प्रतिबंधक लसी अतिथंड झाल्याने गोठल्या होत्या. केंद्रातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने चुकीची कबुली दिल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. निलंबनाच्या कारवाई विरोधात आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज पासून कोरोना लसीकरणाच्या कामावर बहिष्कार टाकलाय. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघाच्या वतीने हा बहिष्कार टाकण्यात आलाय. आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणी साठी हा बहिष्कार घालण्यात आलाय.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या आरोग्य केंद्रावर २७०० लसी वाया गेल्याच्या प्रकरणात आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मात्र कर्मचारी संघटनांच्या मते ही कारवाई अन्यायकारक असून हे निलंबन तातडीने वापस घेण्यात यावे. या वेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने चिमूर येथे निदर्शने करण्यात आली आणि शासनाला एक निवेदन देण्यात आले. निलंबन वापस न घेतल्यास संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाच्या कामावर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय.
भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी आरोग्य केंद्र असून तिथं हा प्रकार घडला होता. लसी डीप फ्रीझ केल्याने झाल्या खराब झाल्या होत्या प्रशासनाने वाया गेलेल्या लसींची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. कामाच्या अति ताणाने चूक झाल्याची कर्मचाऱ्यांची कबुली दिली होती. तब्येत बरी नसल्याने ही चूक झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने मान्य केले होते.
इतर बातम्या:
देशातील पहिलं सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणार, उदय सामंतांची पुण्यात माहिती
Chandrapur 2700 corona vaccine wasted health assistant suspension take back demanded by health workers