गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ते सातपर्यंत गडचिरोली पोहचतील. त्यानंतर ते अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा (review of flood situation) घेतील. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यामुळं त्यांना गडचिरोली जिल्ह्माची चांगली जाण आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता (Pranhita), गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या नद्यांना पूर आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा धरणाचे (Medigatta Dam) 81 दरवाजे सोडण्यात आले. त्यातून मोठ्या पाण्याचा विसर्ग होत आहे. बॅक वॉटरचा फटका गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा बसण्याच्या संकेत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून भामरागड तालुक्याचा व तालुक्यातील 70 गावांचा तालुका, व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. आलापल्ली भामरागड छत्तीसगड हा राष्ट्रीय महामार्गाच्या काम सुरू असून का मग रस्त्यात काम केल्याने हा रस्ता वाहून गेला. भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसांअगोदर एक ट्रक वाहून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्युत विभागाच्या एका कर्मचाऱ्याचाही पाण्यात अंदाज ना टाळल्यामुळे मृत्यू झाला.
मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे #नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांच्याकडून #विदर्भ मधील #पूर परिस्थितीचा आढावा घेतला. pic.twitter.com/gnvy1yGfoh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 11, 2022
सिरोंचा, आलापल्ली, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवसापासून पूर्णपणे बंद होता. या राष्ट्रीय महामार्गावर बामणी, मेडारम, रेपनपल्ली हे छोटे नाले राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. हा राष्ट्रीय महामार्ग आज सुरू झाला. परंतु दोन दिवस बंद असल्यामुळे वाहतूक ठप्प होती. अहेरी तालुका मुख्यालयी तलावाच्या पाण्यात वाढ झाली. अहेरीतील प्रभाग नंबर 14 व 15 मध्ये जवळपास वीस ते बावीस घरांमध्ये पाणी शिरले होते. त्या सर्व परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात NDRF पथक असून हे पथक व परिस्थितीबाबत प्रत्येक क्षणाची अपडेट घेत आहेत.