गडचिरोली : जिल्ह्यातील हत्ती स्थलांतराचा मुद्दा पुन्हा गाजलेला आहे. पातानिल येथील पाच हत्तींपैकी तीन हत्ती रात्रीच्यावेळी गुजरातला स्थलांतर करण्यात आले. कमलापूरमधील हत्ती कॅम्पमधील हत्ती ही स्थलांतर करण्याचे राज्य सरकार व केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याच्या विरोधात स्थानिक नागरिक व काँग्रेस (Congress) पक्ष विरोध करीत आहे. आज काँग्रेस पक्षाने सीसीएफ (CCF) कार्यालयासमोर मोठं आंदोलन केलं. या हत्ती स्थलांतराच्या विरोधात कोर्टात पीआयएलही दाखल करण्यात आली.या अगोदर हत्ती स्थलांतराच्या आदेश काढण्यात आला होता. स्थानिकांचा विरोध पाहता काही काळाकरिता स्थगिती देण्यात आली. परंतु पुन्हा या आठवड्यात तीन हत्तींना रात्रीच्या वेळी गुजरातमध्ये (Gujarat) स्थलांतर करण्यात आले.
कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एकूण नऊ हत्तींचे समावेश आहे. महाराष्ट्रातील व गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सर्वात मोठा हत्ती कम्प म्हणून ओळख आहे. येथील हत्ती स्थलांतर करण्याला कमलापूर वासियांचा व पर्यटक नागरिकांचा विरोध आहे.अशी माहिती जन संघर्ष समितीचे दत्ता शिर्के यांनी दिली. कमलापूर हत्ती कॅम्प असल्यामुळे गावात नेहमी पर्यटक भेट देत असतात. आमचा गाव विकासाच्या वाटेवर आहे. येथील हत्ती स्थलांतर होत असल्याचे आदेश पारित झाले. त्यानंतर आम्ही कमलापूर ग्रामपंचायतीमार्फत विरोध करीत आहोत, असं कमलापूर गावचे ग्रामपंचयात सदस्य म्हणाले.
हत्ती स्थलांतराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दखल घेण्यात आली. नागपूर खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करुन घेतली. वरिष्ठ अधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा यांनी याकडे लक्ष वेधलं. वन विभागाच्या आदेशानं आतापर्यंत तेरापैकी नऊ हत्तींचे गुजरातमध्ये स्थलांतर करण्यात आले. उर्वरित चार हत्ती स्थलांतर करायला विरोध होतो. गडचिरोली येथील हत्ती स्थलांतर होऊ देणार नाही, अशी स्थानिक व काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे.