गडचिरोली : जिल्ह्यात या अगोदर भाजपकडे पाच नगरपंचायती होत्या. अशा भाजपला एक नगरपंचायतीवर ताबा मिळविता आला. आदिवासी विद्यार्थी संघटनेने पहिल्यांदाच अहेरी व सिरोंचा नगरपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली. सिरोंचा नगरपंचायत साधारण व्यक्तींना राजकारणात आणले. दहा नगरसेवकांना जिंकण्यासाठी व सिरोंचा नगरपंचायतच्या (Sironcha Nagar Panchayat) उपाध्यक्ष निवडून आलेल्या बबलु पाशा (Bablu Pasha) यांची किंगमेकरची भूमिका होती. कुरखेडा नगरपंचायत शिवसेनेने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. कुरखेडा नगरपंचायत मागील पाच वर्षांत अडीच वर्षे शिवसेनेकडे सत्ता होती. अहेरी नगरपंचायत भाजप पक्षाला पराभव करून शिवसेनेने आदिवासी विद्यार्थी संघटना (Tribal Students Association) स्थानिक असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. अहेरी नगरपंचायतीत मागील पाच वर्षे भाजप सत्तेत होती. अहेरी या ठिकाणी पहिल्यांदा शिवसेनेने सत्ता स्थापन केली. मुलचेरा या ठिकाणी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी चित्र स्पष्ट आहेत. मुलचेरा या ठिकाणी मागील पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती.
आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याचा पुरेपूर फायदा घेत शिवसेनेने यावेळी दोन नगरपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. एटापल्ली नगरपंचायत काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन काँग्रेस येथे सत्ता स्थापन केली. या ठिकाणी मागील पाच वर्षात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांनी सत्ता सांभाळली होती. गडचिरोली जिल्ह्यातील नऊ पैकी एकही नगरपंचायत भाजपच्या खात्यात जाणार नाही असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे तीन नगरपंचायती आलेल्या आहेत. धानोरा, एटापल्ली, चामोर्शी या तीन नगरपंचायतींमध्ये एकतर्फी सत्ता काँग्रेस पक्षाने हस्तगत केली. धानोरा नगरपंचायतीत एकतर्फी सत्ता काँग्रेसने स्थापन केली. धानोरा येथे मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती. भाजपला यावेळी येथे पराभव स्वीकारावा लागला. चामोर्शी नगरपंचायत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. या ठिकाणीही मागील पाच वर्षात भाजपने सत्ता सांभाळली होती. पण येथे ही भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला.