सांगली : कोरोना केअर सेंटरमध्ये अंडी, मटण यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र या मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण सेंटर सोडायला तयार नाहीत. सांगलीमध्ये डिस्चार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर रूग्णांनी त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या पठ्ठ्याचा व्हिडीओ चक्क व्हायरल झालाय (Corona patient demand chicken before discharge from covid Centre in Sangli).
सांगली जिल्ह्यातील पलुस येथील नगरपरिषदेची निवडणूक 4 महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे येथील सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांची कोरोना केअर सेंटरमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे. अंडी, मटण यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोरोना केअर सेंटरवर भर देण्यात येत आहे. मात्र या मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण सेंटर सोडायलाच तयार नसल्याचं दिसत आहे.
हा एक प्रकार पलुस येथील कॉंग्रेस नगरसेवकांनी सुरु केलेल्या डॉ पतंगराव कदम कोविड केअर सेंटरमध्ये पहायला मिळाला. डिस्चार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर दाखल रूग्णांनी त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला आणि या चिकनप्रेमी रूग्णाची चर्चा शहरात चवीने चर्चिली जात आहे.
Corona patient demand chicken before discharge from covid Centre in Sangli