रत्नागिरी: सध्या राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी असलेल्या रत्नागिरीत प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा (Coronavirus) स्वॅब स्टेस्ट न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. कारण स्वॅब टेस्टला नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात आता थेट गुन्हा दाखल होणार आहे. (Coronavirus swab test are compulsory in Ratnagiri for peoples in contact with Covid patient)
राज्यात कोल्हापूरनंतर रत्नागिरी हा सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटी असणारा जिल्हा आहे. मध्यंतरी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करुनही रत्नागिरीत फारसा फायदा झाला नव्हता. आतादेखील रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दिवसाला 500 हून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी संपर्कात आलेल्यांचे आरटीपीसीआर टेस्टची संख्या प्रशासनाने वाढवली आहे. पण स्बॅब टेस्टला विरोध करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही.
सध्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 15 हून अधिक व्यक्तींचे ट्रेसिंग आरोग्य यंत्रणा करतेय. त्यामुळे आता येत्या दोन दिवसात स्बॅब टेस्ची संख्या 7 हजारांच्या घरात नेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पण या स्बॅब टेस्टला विरोध करणाऱ्यांवर आता पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.
गेल्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमन्यांनी यंदा सुरुवातीपासूनच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात (Konkan) जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच फुल्ल झाले आहे.रेल्वेने 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे. काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडोंच्या घरात प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही 14 तारखेपासून पुढील सहा -सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असल्यामुळे शहरातील लोकांना कोकणात जाण्यास मज्जाव करण्याला आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी आणि 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा चाकरमन्यांनी ही कसर भरून काढायचे ठरवले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसाठी आतापासूनच बुकिंग होताना दिसत आहे.
इतर बातम्या:
चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल
रत्नागिरीत लॉकडाऊन अयशस्वी, पॉझिटिव्हीटी दरात दुसऱ्या स्थानी, मृत्यूदरामुळं टेन्शन वाढलं
Corona Cases In India | देशात नवे कोरोनाग्रस्त 60 हजारांच्या घरात, कोरोनाबळींतही 1200 ने घट
(Coronavirus swab test are compulsory in Ratnagiri for peoples in contact with Covid patient)