नांदेड : जिल्ह्यातील भोकरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा फज्जा उडालाय. लागवडीसाठी आलेली रोपे रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी तक्रारीनंतर सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितलंय. एका आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर वनीकरण विभागाचा हा अपहार उघड झालाय.
नांदेडमध्ये वृक्षारोपण मोहीम कागदावरच राबवली जात असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्याने केलीय. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण देखील केलं, मात्र भोकर तालुक्यातील या भ्रष्टाचाराकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. भोकर तालुक्यात झाडे लावण्यासाठी केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत तर लागवडीसाठी आलेली रोपटे फेकून दिल्याचा प्रताप इथे करण्यात आलाय.
त्यामुळे भोकर तालुक्यात वृक्ष लागवड निव्वळ देखावा असल्याचे चित्र आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा हा भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला असून तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ वनीकरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
(Corruption of social forestry department In nanded bhokar)
हे ही वाचा :