दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; वाचा सविस्तर

| Updated on: Aug 02, 2021 | 2:44 PM

दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा जीआर आज काढण्यात येणार आहे. (cm uddhav thackeray)

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; वाचा सविस्तर
cm uddhav thackeray
Follow us on

सांगली: दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा जीआर आज काढण्यात येणार आहे. मात्र, ज्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आज स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.

आज संध्याकाळी जीआर

राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकलचा निर्णय लगेच नाही

यावेळी त्यांनी मुंबई लोकल सुरू करण्याच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. मुंबई लोकलबाबत आपण लगेच निर्णय घेणार नाही. कारण कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथील करत आहोत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहूनच निर्णय घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या

यावेळी त्यांनी कार्यालयांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची कळकळीची विनंती केली. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्या. वर्क फ्रॉम होम करणं शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करायला सांगा. उद्योगांनी शक्य आहे तिथे बायो बबल करणे व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

संबंधित बातम्या:

सांगली-कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, कठोर निर्णय घ्यावेच लागतील, उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार?

चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, सांगलीत मात्र दोघांचे कार्यकर्ते भिडले