सांगली : डबल महाराष्ट्र केसरी पहेलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनने भाळवणी येथे रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. सुमारे दहा एकर परिसरात माळरानावर ऐतिहासिक स्पर्धा पार पडली. सुमारे २०० स्पर्धक बैलगाडी स्पर्धेत सहभागी झाले होते. थार गाडीचे पहिले बक्षीस कोणती बैलजोडी जिंकते, यासाठी खरी स्पर्धा होती. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुणे म्हणून बरेच मान्यवर उपस्थित होती. ही स्पर्धा प्रतिष्ठेची झाली होती.
या बैलगाडी स्पर्धेत मुळीशी येथील मोहील शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराड रेठरेच्या सदाशीव कदम यांच्या महिब्या बैलजोडीने मैदान मारले. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या रुस्तुम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीमधील विजेत्या बकासुर आणि महिब्या या बैलजोडीच्या दोन्ही मालकांनी थार गाडीवर ताबा सांगितला असता. यावरून वाद निर्माण होऊ शकत होता.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दोघांनाही थार गाडी देण्याचा निर्णय घेतला. शर्यतीत बकासुर आणि महिब्या या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे थार गाडीचे बक्षीस पटकावले होते. पण थार गाडी कुणी घ्यायची असा तिढा निर्माण झाला होता.
शेवटी चंद्रहार पाटील यांनी दोन्ही बैल मालकात थार गाडीवरून वाद होऊ नये ही भूमिका घेण्यात आली. बकासुर आणि महिब्या या दोन्ही बैलं मालकांना थार गाडी देण्याचा निर्णय घेतला. आज शोरूमला जाऊन दुसरी थार गाडी ही बुक करण्यात आली. दोन्ही गाड्यांच्या रिसीट दोन्ही मालकांना दिल्या गेल्या.
त्यामुळे दोन्ही बैलजोडीचे मालक खूश झालेत. आता दोघांना दोन थार मिळणार आहेत. आधी एक थार असल्याने दोन मालकांना ती कशी द्यायची असा प्रश्न पडला होता. हा प्रश्न चंद्रहार पाटील यांनी सोडवला. बकासूर आणि महिब्या या दोन्ही बैलांच्या दोन्ही मालकांना आता थार मिळणार आहे.