उस्मानाबाद : जगभरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. देशासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची सोशल मीडियावर मिम्स शेअर करत वेगवेगळा मजकूर लिहून बदनामी केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूम तालुक्यातील पाच जणांनी सोशल मीडियावर ग्रुप तथा वैयक्तिक पेजच्या माध्यमातून ही टीका करण्यात आली आहे. यामध्ये खेकडा, हाफकिन असा संदर्भ लावून कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. इतकंच काय यामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचीही तुलना यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची बदनामी केल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर मेम्स कट्टा या ग्रुपवर अर्जुन शिंदे यांनी, मीम नाका ग्रुपमध्ये जितेंद्र रायकर, एक कोटी हसणाऱ्या ग्रुपमध्ये आरएन पाटील, रोशनी शिंदे यांनी बदनामी कारक मजकूर पोस्ट केल्याचा आरोप आहे.
तर स्वतःच्या अकाऊंटवर काहींनी डॉ. तानाजी सावंत यांचा अवमान आणि द्वेषभावणेतून आदर कमी होईल अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावर फोटो लावून केल्याने बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भूम तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा खेकडा, हाफकीनसह अन्य मिम्स तयार करून सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.