चंद्रपूर : चांदागडची आई या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या देवी महाकालीची ( Devi Mahakali) यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी अर्थात सात एप्रिलपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र- तेलंगणा- आंध्रप्रदेश -छत्तीसगड या राज्यातून लाखो भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी या काळात चंद्रपुरात दाखल होतात. जिल्हा प्रशासन (District Administration) व मंदिर व्यवस्थापन (Temple Management) दोन वर्षाच्या कालावधीनंतर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सज्ज झाले आहे. चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनाकाळानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांना या ऐतिहासिक देवस्थानातील महाकाली मातेचे मनमोकळेपणाने दर्शन घेता येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवी महाकालीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या काळात चंद्रपुरात दाखल होतात. चैत्र नवरात्र निमित्त महिनाभर देवी महाकालीच्या यात्रेनिमित्त शहरात श्रद्धेचा सागर असतो.
जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारल्या आहेत. पाणी- शौचालय -निवास- आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. चंद्रपूरचा उच्चांकी उन्हाळा लक्षात घेता दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे लावण्यात आले आहेत, अशी माहिती महाकाली मंदिराचे विश्वस्त पुजारी सुनील महाकाले तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
यात्रेच्या निमित्ताने चंद्रपुरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. चैत्र पौर्णिमेचा दिवस यात्रेचा सर्वात मोठा दिवस असतो. त्यादरम्यान शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. भक्तांच्या स्वागतासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले आहेत. राज्यभरातील देवी भक्तांना आता महाकाली मातेच्या दर्शनाची आस लागली. जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक सोयी सुविधा केल्या आहेत. पाणी- शौचालय -निवास- आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहतील.