धुळे: राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं 29 ची मॅजिक फिगर क्रॉस केली आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. भाजपनं आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 5 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे.
धुळे जिल्हा परिषद गट निकाल
5 भाजप
1 राष्ट्रवादी
1 शिवसेना
पंचायत समिती गण
12 भाजप
1 राष्ट्रवादी
भाजप – 39
काँग्रेस – 7
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – 3
अपक्ष – 3
भाजप – 12
काँग्रेस – 1
शिवसेना – 2
भाजप : 39 – 12 = 27
काँग्रेस : 7 -1 = 6
शिवसेना : 4 -2 = 2
राष्ट्रवादी : 3
अपक्ष : 3
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपानं बहुमताचा 29 चा आकडा गाठला आहे. भाजपाचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.
इतर बातम्या:
Dhule ZP by Election : भाजपला बहुमतासाठी 2 जागांची गरज, महाविकास आघाडीचं तगडं आव्हान
Dhule ZP and Panchayat Samiti Election Results 2021 counting live Updates BJP needs two seat for came in power bjp candidate Dharati Devare contest from lamakane seat