नांदेड : राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे (India Mega Agro) संचालक अजय बाहेती (Ajay Baheti) यांना अटक केलीय. काही महिन्यांपूर्वीच बाहेती यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर कंपनीत त्यांनी उत्पादन ही सुरु केले होते. कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी भागात अजय बाहेती यांची इंडिया मेगा ऍग्रो अनाज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली होती. (ED Arrested Ajay Baheti in nanded over PDS Scam)
त्यानंतर मीना यांनी वेगळे पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावला. वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात शासकीय धान्याचे ट्रक इंडिया मेगा कंपनीत जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या संचालक यासह धान्य पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल केले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेती सह अन्य मंडळींची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर बाहेती यांनी परत आपल्या व्यवसायास सुरवात केली होती. परंतु शुक्रवारी ईडीने बाहेती यांना अटक केलीय.
बाहेती यांनी जवळपास 3 हजार राशन दुकान आणि 27 गोदाम यांच्या माध्यमातून शासकीय धान्याचा घोळ घातल्याचा आरोप करीत मनी लॉन्डिंगच्या आरोपावरून बाहेती यांना ताब्यात घेतलय. त्यानंतर बाहेती यांना आठ दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी सहभागी असल्याचे ईडीने नमूद केले आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
बाहेती यांच्या कृष्णुर इथल्या इंडिया मेगा या कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना देखील फसवलंय. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांचे पैसे बुडवून बाहेती महिना भरापासून फरार आहे. आपले पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीबाहेर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ही केले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता तर धान्य घोटाळ्याचा तपास ED कडे गेल्याने शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील असा प्रश्न निर्माण झालाय. (ED Arrested Ajay Baheti in nanded over PDS Scam)
हे ही वाचा :
ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?
अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेतला, आणखी कारवाईही केली, पोलिसाविरोधात बंड, थेट आत्महत्या
Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक