सांगली : राज्यासह देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात जोरदार खळबल उडाली आहे. राष्ट्रवादीसह मित्र पक्षांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती अनेक नेत्यांनी केली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्विट करून त्यांना विनंती केली आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार यांच्या या निर्णयावर टीकाही केली जात आहे. शरद पवार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे ती घोषणा राजकीय हेतूने केली असल्याची टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.
रघुनाथदादा पाटील यांनी त्यांच्या या निर्णयावर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय खेळी आहे.
त्यामुळे त्यांच्या या निर्णयानंतर आता त्यांचे चेले त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी ते आंदोलन करतील असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लगावला आहे.
शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे.
शरद पवार यांचा स्वभाव पाहता आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो राजकीय हेतूने घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
आता त्याच्या या निर्णयानंतर त्यांचे चेले आता आंदोलन करतील आणि त्यानंतर ते परत सांगतील की मी निर्णय मागे घेत आहे असं रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे.
शरद पवार यांच्या कोणत्याही निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असताता, त्यामुळे त्यांचा हा निर्णयही राजकीय असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली आहे.