Nanded Crime : नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे नुकसान

| Updated on: Feb 27, 2022 | 5:02 PM

विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत अनेक जण किरकोळ स्वरूपाचे जखमी झालेत. किरकोळ कारणावरून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात हा राडा झालाय. त्यात दोन मोटारसायकलीला आग लावण्यात आलीय, तर तीन मोटारसायकलीची तोडफोड करण्यात आलीय.

Nanded Crime : नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे नुकसान
नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा
Follow us on

नांदेड : नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर इथल्या वसतिगृहात दोन विद्यार्थ्यां (Students)च्या गटात किरकोळ कारणावरून मोठा राडा (Fighting) झाला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी बहुल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना शांत केलं आहे. या प्रकरणी दोषी विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या जाळपोळ आणि तोडाफोडीमुळे मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Fighting between two groups of students in Nanded, Damage to five motorcycles)

विद्यार्थ्याच्या दोन गटात अनेक जण किरकोळ जखमी

विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत अनेक जण किरकोळ स्वरूपाचे जखमी झालेत. किरकोळ कारणावरून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात हा राडा झालाय. त्यात दोन मोटारसायकलीला आग लावण्यात आलीय, तर तीन मोटारसायकलीची तोडफोड करण्यात आलीय. या घटनेनंतर इस्लापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. यातील दोषी विद्यार्थ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी आहेत इथे

किनवट तालुक्यातील इस्लापुर इथल्या या वसतिगृहात सहावी ते बारावी वर्गात शिकणारे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. राज्य सरकारच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून हे वसतिगृह चालवण्यात येते, ज्यात राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी इथे राहतात. त्यातून विद्यार्थ्यांत गटतट पडल्याने आजचा हाणामारीचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येतय. यातील बहुतांश विद्यार्थी अल्पवयीन असल्याने आजचे भांडण सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलंय. (Fighting between two groups of students in Nanded, Damage to five motorcycles)

इतर बातम्या

Ulhasnagar Fire : उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग, आगीत जीन्सचे रोल आणि मशिनरी जळून खाक

Ichalkaranji Fire : इचलकरंजीत गुंज व स्क्रपच्या स्क्रॅप गोदामांना आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान