चंद्रपूर : महानगरपालिकेच्या कचरा संकलन डेपोला (Garbage Depot) मोठी आग लागली. संपूर्ण कचरा संकलन डेपोच आगीच्या विळख्यात आलंय. चंद्रपूर शहराच्या सीमेवर बल्लारपूर वळण मार्गावर (Ballarpur Marg) कचरा संकलन डेपो आहे. कचरा वर्गीकरण संयंत्रासह संपूर्ण यंत्रसामग्री आगीच्या विळख्यात आली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र- चंद्रपूर मनपा -बल्लारपूर नगर परिषद, धारीवाल आदी ठिकाणांहून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण मात्र अज्ञात आहे. सकाळपासून अग्निशमन पथकांकडून (Fire brigade) आग विझवण्याचे काम सुरू आहे.
चंद्रपूर मनपाच्या कचरा संकलन डेपोला लागलेली आग. pic.twitter.com/YtBCneFvxX
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) May 9, 2022
आग पहाटे आग लागली. माहिती होताच मनपाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या कंपन्यांच्या कंपन्यांना या आगीपासून धोका आहे. कचरा असल्यामुळं लवकर आग विझवता आली नाही. ही आग पसरत आहे. आगीचे लोळ पेटत आहेत. कचरा विल्हेवाटीच्या नवीन प्रोजेक्टसाठी शेड बांधला होता. तो जळून खाक झाला. मागील भाजपच्या सत्ताकाळात चंद्रपूर नगर महानगरपालिकेच्या या कचरा संकलन डेपोची उत्तम व्यवस्थापन केल्याने प्रशंसा झाली होती. कचरा डेपोचा परिसर शहरातील महत्त्वाचं ठिकाण आहे. याठिकाणी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. कचरा विल्हेवाट लावून सिमेंट कंपनीत पाठविला जातो. याच ठिकाणी आग लागल्याने शेड संपूर्ण जळून खाक झाले.
चंद्रपूरच्या कचरा डेपोला आग लागली. ही आग खूप मोठी आहे. यामुळं बहुतेक कचरा जळून खाक झाला. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शेड तयार करण्यात आले होते. त्या शेडलाही आग लागली. याठिकाणाहून कचरा हा सिमेंट कपंनीला पाठविला जात होता. याठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट केली जात होती. पण, आज अचानक आग लागली. या आगीमुळं कचरा डेपो चांगलाच धुमसत आहे. अग्निशमन पथक बंबच्या साह्याय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, अद्याप आग नियंत्रणात आलेली नाही.