गडचिरोली : जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी रेतीघाटावर रात्रोदरम्यान खोब्रागडी नदीपात्रातून पोकलँन, जेसीबीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळुचा उपसा सुरू होता. तस्करी करीत असलेल्या १६ वाळू तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. याप्रकरणी १२ मोठे ट्रक आणि टिप्पर तसेच अवैध रेती वाहतुकीकरिता गस्त घालणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. ३ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस विभागाची रेती तस्करांवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. डोंगरतमाशी रेतीघाटावर १४ मार्चला रात्री १० च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे गडचिरोली पोलिसांनी सापळा रचला. नदीपात्रातून वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबीचे साहाय्याने वाळुची अवैधरीत्या उपसा करीत असल्याचे आढळले.
चोरी केलेल्या रेतीची रात्रीच विल्हेवाट लावून परजिल्ह्यात विकत असल्याचे स्पष्ट झाले. रेतीघाटावर पंचासमक्ष पंचनामा केला. खोब्रागडी नदीपात्रातून उपसा करण्याकरिता वापरण्यात येणारे पोकलेन मशीन आणि रेती वाहतुकीकरिता वापरात येणारे १२ मोठे ट्रक व टिप्पर जप्त करण्यात आले. तसेच अवैध रेती वाहतुकीकरिता आरोपींचे गस्त घालण्याकरिता असलेली कार जप्त करण्यात आली.
यात निखील भुरे वाठोडा, राहुल घोरमोडे बेटाळा, जि. चंद्रपूर, सोनल उईके डोंगररतमाशी, धनंजय मडावी डोंगरतमाशी, यशवंत मडकाम कुरंडीमाल , नितेश मालोदे निलज, जि. भंडारा, अफसर अनवर शेख ता. भिवापूर, अब्दुल राजीक मो. इस्माईल अमरावती, अत्ताउल्ला खॉन रियाज उल्ला खॉन, लालखडी, अमरावती, नरेश ढोक भिवापूर, नासीर नाजीम शेख, बिडगाव ताजनगर ता. कामठी, संतोष पवार तळेगाव ठाकूर ता. तिवसा, शेख वसीम शेख जलील मंगरुळ दस्तगिर ता. धामनगाव, निखील सहारे विरली, जि. भंडारा, जावेद जमीर खान ओलंग (झारखंड), शाम चौधरी वय कोरधा जि. चंद्रपूर अशा १६ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.
आरोपींना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली कडून करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले. जिल्ह्यात चोरुन लपून रेती घाटावरुन नदीपात्रातून रेतीचा अवैधरीत्या उपसा करणाऱ्या तस्करांना धडकी भरली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, दीपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम वाडगुरे, नरेश सहारे, हेमंत गेडाम, सतिश कत्तीवार, दिपक लेनगुरे, शुक्रचारी गवई, राकेश सोनटक्के, सुनिल पुलावार, मंगेश राऊत, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सचिन घुबडे, अकबर पोयाम, संजु कांबळे, सुयश वट्टी, माणिक दुधबळे, पुर्णचंद्र बांबोळे, शगीर शेख, मनोहर येलम, पंकज भगत, देवेंद्र पिदुरकर यांनी केली आहे.