Gadchiroli Police: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी मोठा निर्णय, या पोलीस दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक

| Updated on: Aug 18, 2023 | 3:19 PM

ही बाब सिरोंचा येथील कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस शिपाई नईम शेख यांच्या लक्षात आली. त्यानंतर नईम शेख या दाम्पत्याने घरी चर्चा केली. त्यानंतर मोठा निर्णय घेतला.

Gadchiroli Police: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी मोठा निर्णय, या पोलीस दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक
Follow us on

मोहम्मद इरफान, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अति संवेदनशील मागासलेला क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील वेनलाया या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे येथील आदिवासी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहत होते. त्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक साहित्य मिळत नव्हते. ही बाब सिरोंचा येथील कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस शिपाई नईम शेख यांच्या लक्षात आली. त्यानंतर नईम शेख या दाम्पत्याने घरी चर्चा केली. त्यानंतर मोठा निर्णय घेतला. पहिली ते चौथीपर्यंत 75 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

वेनलाया गावात आनंद

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या दाम्पत्याने सिरोंच्यापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेनलाया गावात गेले. जवळपास 75 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य आणि क्रीडा साहित्य वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. नईम शेख आणि पोलीस शिपाई रुक्सार शेख या दोघांनी जवळपास या गावाला चार ते पाच वेळा भेट दिली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या गावातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.

शैक्षणिक साहित्यासाठी घेतले दत्तक

मी आणि माझी पत्नी दोघेही पोलीस गडचिरोली पोलीस येथे कार्यरत आहोत. एक चांगला उपक्रम करण्याच्या उद्देश माझ्या मनात अनेक वर्षापासून होता. मी एक गोरगरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. मला समाजकार्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. या जिद्दीने मी वेनलाया येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. असं नईम शेख यांनी सांगितलं.

सिरोंच्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणाले, आमच्या विभागातील पोलीस शिपाई आणि त्याची पत्नी एक चांगला उपक्रम राबवत आहे. ही आनंदाची बाब असल्याचं सुभाष शिंदे म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

रुक्सार शेख म्हणाल्या, माझ्या पतीने सांगितले की, आदिवासी मुलांना शैक्षणिक दत्तक घ्यायचे आहे. मला ही बाब आवडल्याने मी त्यांना होकार दिला. वेनलाया, मर्रीगुडम गावातील शाळेत काल गेलो होतो. आम्हाला गेटवर पाहून त्यांना आनंद झाला. आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही भारावून गेलो. पहिली ते चौथीपर्यंतच्या ७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक साहित्य लागणार ते आम्ही पुरवणार आहोत.