“तुमचा उत्साह बघुन नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एकाच वाक्यात उत्तर दिलं

| Updated on: Jun 13, 2023 | 9:33 PM

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सरकारचे सर्वसाधारण धोरण आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमचा उत्साह बघुन नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एकाच वाक्यात उत्तर दिलं
Follow us on

कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने त्यांनी सरकारच्या योजना सांगत हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचा विश्वास नागरिकांना दिला. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत कोल्हापूरकरांच्या भावनेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

कोल्हापूरकरांसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुमचा उत्साह बघून नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी झाला असेल या शब्दात त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कार्यक्रम असल्याने कोल्हापूरातील तपोवन मैदानावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या गर्दीला अनुसरुन एकनाथ शिंदे म्हणाले की, उच्चांकी गर्दी करून कोल्हापूरकरानी विषय हार्ड केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जनसामान्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या जिव्हाळचे सरकार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेल्या सर्व कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हितापेक्षा कोणताही दुसरा निर्णय घेतला नाही, तर अनेक नागरिकांच्या फायद्याचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. आम्ही 29 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. त्याचा फायदा नक्कीच राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकांना होणार आहे.

तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सरकारचे सर्वसाधारण धोरण आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील विकासाला गती मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळेच महाराष्ट्र राज्य उद्योग धंद्यात 11 महिन्यात महाराष्ट्र पुन्हा नंबर वनवर आला आहे असून या सरकारमुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात जोरदार आंदोलन आणि निवेदन देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी मुख्य न्यायाधीशांबरोबर बोलून तात्काळ हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.