अकोला : अकोला जिल्ह्यातील एका निष्णात हॉकीपटूचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चंदन ठाकूर असं हॉकीपटू खेळाडूचं नाव आहे. नदीच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्हातील उत्कृष्ट राष्ट्रीय व अंतर विद्यापीठ हॉकी खेळाडू चंदन ठाकूर याचा नंदापूर येथील नदीत बुडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या नंदापूर येथे चंदन मामाच्या घरी गेला होता. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. (Hockey player drowns due to unpredictable river water)
12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग, वासनांध नराधमाच्या मुसक्या आवळल्या
राज्यातल्या विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता हिंगोलीमधून धक्क्दायक घटना समोर येतीय. हिंगोलीतील 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी विकृताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारातील ही घटना घडली. हिंगोलीतल्या सेनेगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्ह ादाखल केला आहे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे.
पीडित 12 वर्षीय मुलगा राहणार गोरेगाव हा अल्पवयीन, अंध आदिवासी तसेच दिव्यांग आहे. आरोपीला माहिती असूनही त्याने मुलाला शेतात नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गोरेगाव पोलिसांनी विकृताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यास अटकही केली आहे.
हे ही वाचा :
पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक
मुलगी नव्हे, 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग, वासनांध नराधमाच्या मुसक्या आवळल्या
कामावरुन काढून टाकल्याचा राग, पुण्यात चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली