बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील एक विहीर सध्या चर्चेचा विषय ठरलीय. अकोली गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी ही विहीर आहे. या विहिरीतील पाणी अचानक गरम झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. याच परिसरात असलेल्या दुसऱ्या विहिरीत मात्र साधारण पाणी आहे. सोळंके यांच्या घराजवळ असलेल्या या विहिरीमध्ये गरम पाणी येत असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (hot water coming out from well of Akoli village in Buldhana district)
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील अकोली हे गाव आहे. या गावात भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी एक विहीर आहे. या विहिरीतून मागील आठवड्यापासून अचानक गरम पाणी येत आहे. विशेष म्हणजे या विहिरीशेजारी 20 ते 25 फुटांवर दुसरी विहीर आहे. मात्र या विहिरीमध्ये सर्वसाधारण पाणी आहे.
भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने गावातील तसेच परिसरातील नागरिक या विहिरीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या विहिरीतील पाणी अतिशय गरम आहे. हे पाणी अंघोळीसाठी वापरायचे असेल तर त्यामध्ये बाहेरचे थंड पाणी टाकावे लागत आहे, असा दावा गावातील नागरिक करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्याच्या सर्व्हेक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तहसीलदारांनी या विहिरीची पाहणी केल्याचं सांगण्यात आलं. या विहिरीतल्या गरम पाण्यासह बाजूच्या विहिरीतील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पाणी तपासणीनंतर विहिरीतील पाणी गरम होण्यामागचे नेमके कारण किंवा निष्कर्ष काढण्यात येईल, अशी माहिती भूगर्भ तज्ज्ञ विश्वास वालदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भूगर्गात अनेक हालचाली होत असतात, त्यामुळे अशा घटना घडतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला
(hot water coming out from well of Akoli village in Buldhana district)