वर्धा : वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसाने पहाटेच्या सुमारास रामकृष्ण चौधरी यांच्या घराची अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेत पत्नी-पत्नीचा मृत्यू झालाय. झालेल्या दुर्घटनेमुळे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
राज्यभरात गेले दोन दिवस तुफान पाऊस झाला. दहेगावमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज पहाटेच्या सुमारास भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.. मागील चार दिवसांपासून खरांगणा शिवारात पाऊस होत आहेय. बुधवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती… पहाटेच्या सुमारास रामकृष्ण चौधरी यांच्या घराची अचानक भिंत कोसळली.
नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच भिंत बाजूला करत सर्वांना बाहेर काढले. घटनेत ज्योती रामकृष्ण चौधरी यांचा जागीच तर रामकृष्ण चौधरी यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या दुर्घटनेत मुलगा आदित्यही जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमीला वर्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय.
मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. दोन दिवसात तब्बल 31 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे, तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मराठवाड्यात 120 ते 150 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला असून तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादेत 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रौद्र रुप धारण केलं होतं. त्यानंतर आकाशात विजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. सव्वा आठच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरात तसेच जिल्ह्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह बीडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. गेवराई तालुक्यात तर पावसाने कहर केलाय. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी परिसरातील तीन तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने खरिपाचे सर्वच पीके वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. तलाव फुटून हजारो हेक्टरवरील पीके उध्वस्त झाली आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द येथील पाझर तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पीके अक्षरशः वाहून गेली. यंदा पाऊस चांगला आल्याने खरिपाची पीके चांगली आली होती मात्र या मुसळधार पावसाने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
(Husband and wife death in wall collapse Maharashtra Wardha Rain update)
हे ही वाचा :
मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबर फटका, दोन दिवसात 31 जणांचा बळी, पाच जण बेपत्ता
औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन
अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या