कोल्हापूर : इचलकरंजीतील बालाजी चौक हा रहदारीचा मार्ग. या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. शिवाय छोटेमोठे अपघात होत असतात. असाच एक अपघात बालाजी चौकात झाला. यात वेगाने जाणाऱ्या मोफेड चालकाने ज्येष्ठ महिलेला चिरडले. या अपघातानंतर नागरिक गोळा झाले. त्यांनी मोफेडचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी झाले नाही. मोफेड चालक सुसाट वेगाने महिलेला अत्यवस्थ अवस्थेत सोडून पळून गेला.
इचलकरंजी शहरामध्ये बालाजी चौक येथे 31 मार्च रोजी अज्ञात मोपेड वाहनाच्या धडकेत एक वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली. ही धडक इतक्या जोराची होती की सदर महिलेचा पूर्णपणे पाय निकामी झाला आहे. उपचारासाठी त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु जास्त प्रमाणात मार लागल्या असल्याने त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
सदरची मोफेड वाहक न थांबता त्या वृद्ध महिलेला जखमी अवस्थेत सोडून तेथून निघून गेला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो खूप वेगाने वाहन घेऊन तेथून पलायन झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाजवळील खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चेक केले.
धडकून गेलेल्या मोपड गाडीचा नंबरच दिसत नाही. बालाजी चौक येथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे सदर घटना रेकॉर्ड झाली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणातील फुटेज घ्यावे. संबंधित मोफेट वाहन चालकावर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बालाजी चौक ते गैबान पेट्रोल पंप हा रस्ता शहापूरकडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे. नेहमी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. काही अंतरावर एसटी आगार आहे. त्यामुळे वाहतुकीची नेहमी कोंडी होत असते. वारंवार लहान-मोठे अपघात घडतात. हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे. येथे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.