कोल्हापूर : घरगुती वादातून एका महिला कॉन्स्टेबल (Lady Constable)ने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. योगिनी सुकुमार पोवार (36) असे आत्महत्या करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिली आहे. यात पती शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. (In Kolhapur a female constable committed suicide by hanging herself at her residence)
मयत योगिनी पोवार या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. योगिनी यांना त्यांच्या पतीकडून नेहमी शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून योगिनी यांनी कसबा बावडा पोलिस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (In Kolhapur a female constable committed suicide by hanging herself at her residence)
इतर बातम्या
Jalgaon Child Death : बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू, जळगावमधील धक्कादायक घटना