गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज (Desaiganj) तालुक्यात वाघाची दहशत आहे. वाघ गावात दिसताच नागरिकांनी जमा होऊन गोंधळ घातला. वाघाला हुसकावून लावले. परिसरात वाघाची दहशत आहे. गावालगतच्या झुडपी जंगलात (Shrub Forest) वाघ असल्याची माहिती समजली. गावकरी वाघाला पहायला तिथं जमा झाले. वनविभाग कमर्चारी पोलीसही पोहचले. अखेर वाघ दिसताच नागरिकांनी चारही बाजूने आरडाओरडा सुरु केला. नागरिकांचा गोंधळ ऐकताच वाघ झुडपाच्या बाहेर पडला. अखेर नागरिकांनी जोरात कल्ला सुरु केला. वाघ पहायला लागला. अखेर वाघाच्या मागे नागरिक वाघ पुढे असे चित्र काही वेळेपुरतं तयार झालं मात्र, नागरीकांच्या गोंधळाने वाघ जंगलात पळून (Tiger Run) गेला.
गडचिरोलीतील शेतात वाघाने डरकाळी फोडली, गावकरी एकत्र आले, pic.twitter.com/leryzmoF9q
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) August 22, 2022
देसाईगंज तालुक्यातला व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत गावकरी एकत्र झाले आहेत. शेतालगत झुडपं आहेत. त्या झुडपात वाघ लपला आहे. एक व्यक्ती त्या वाघाजवळ दिसतो. अरे तो एकटा माणूक काय करेल, अशी गावकरी म्हणतात. लोकं एकत्र आले. त्यांनी वाघाला पळवून लावण्यासाठी गलका केला. त्यानंतर वाघ बाहेर निघाला त्यानं धूम ठोकली. रुबाबदार वाघ पळताना पाहून गावकऱ्यांचा जोश आणखीणचं वाढला. ते वाघाच्या पाठीमागे धावले. वाघ जंगलात पळून गेला. गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सहसा वाघ हा जंगलाशेजारी शिकार करतो. गाई, बकऱ्यांना ठार करतो. कधीकधी माणसांनाही संपवितो. पण, या ठिकाणी गावकऱ्यांनी वाघाला पळवून लावले. वाघ शेताजवळ आल्याचं माहीत होताच सर्वजण एकत्र आले. त्यांनी वाघालाच जंगलात पळवून लावले.
गावकरी एकत्र आले. त्यांनी वाघाजवळ मोठा गलका केला. त्यामुळं झुडपातून वाघ निघाला. तो जोरानं पळू लागला. लोकं वाघाच्या मागे धावले. जोरदार आवाज केला. गेला, गेला म्हणून आनंदित झाले. झुडपातून शेतात. शेतातून जंगलात वाघाला पळता भूई थोडी झाली. गावकरी एकत्र आले तर काय करू शकतात, हे यातून दिसून आलं.