सांगली : भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. टी-20 स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तानसोबत रविवारी सामना पार पडला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला.
भारतीय संघाच्या पराभवामुळे संतप्त क्रिकेटप्रेमी प्रक्षेकांनी रस्त्यावर टीव्ही आणून फोडून टाकला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीत हा प्रकार घडला आहे. त्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.
पाहा व्हिडीओ –
पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव
टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सर्वात बहुप्रतिक्षित सामना असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची अखेर सांगता झाली. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच अतिशय खराब झाली आहे.
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.
India vs Pakistan T20 World Cup Result: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव, ओपनर्सनी सामना जिंकला, भारतीय बॅटींगची दाणादाणhttps://t.co/QMghHEjaGj#indiaVsPakistan | #pakistanwon | #Indialost | #T20WorldCup
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021
संबंधित बातम्या :
India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल