सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद, वाचा 21 तासांमध्ये काय घडलं!  

| Updated on: Dec 29, 2021 | 6:45 AM

सांगलीच्या मार्केट यार्डात (Sangli market yard) घुसलेला गवा (Gaur) तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद झाला आहे. पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये हा गवा आला होता. तर गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले.

सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद, वाचा 21 तासांमध्ये काय घडलं!  
गवा
Follow us on

मुंबई : सांगलीच्या मार्केट यार्डात (Sangli market yard) घुसलेला गवा (Gaur) तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद झाला आहे. पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये हा गवा आला होता. तर गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले. विशेष म्हणजे गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गवत टाकून त्याला व्हॅनमध्ये नेण्यात वन विभागाला यश आले.

तब्बल 21 तास रेस्क्यू ऑपरेशन

गव्याची मेडिकल तपासणी करून पुन्हा गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा गवा मार्केट यार्डमध्ये काल पहाटे 5 वाजता आला होता आणि गव्याचे रेस्कु ऑपरेशन मध्यरात्री दीड वाजता पूर्ण झाले. विशेष म्हणजे हा गवा सांगलीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सतत दिसत होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हा गवा शहराच्या बाहेर दिसत होता. मात्र, त्यानंतर हा गवा थेट मार्केट यार्डात दिसला.

सांगलीकरांनी घेतला सुटकेचा निश्वास

मार्केट यार्डामध्ये गवा असल्याची बातमी सांगलीमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. गव्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. मात्र, पोलिसांनी मार्केट यार्डची दोन्ही मुख्य प्रवेशव्दार बंद करून घेतली होती आणि सर्व वाहतूक देखील बंद केली होती. इतकेच नाहीतर मार्केट यार्डमध्ये जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले होते. मात्र, गव्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी वाढतच होती. शेवटी मध्यरात्री दीड वाजता गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला.

संबंधित बातम्या : 

Pune | सॉक्टवेअर इंजिनिअरींगच्या तब्बल 28 मुलींना विषबाधा, 6 जणींची तब्बेत खालवली, ससूनमध्ये आणलं!

दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ