रत्नागिरी : सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील भाजपच्या बैठकीमुळे राज्यातील राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडणार असल्याची चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी स्पष्टच सांगितले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मी आगोदरपासून सांगतो होतो की, आम्ही शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविणार आहोत.
अगदी ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत महायुती म्हणूनच आम्ही एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीबाबतीत निर्णय़ घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार असून अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक राजकीयदेखील असू शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सहकार क्षेत्रातील अडचणीसंदर्भात एकनाश शिंदे आणि फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळातही आम्ही भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढविणार आहे.
त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे पण त्याबद्दल आताच कशाला सांगू असंही त्यांनी खोचकपणे प्रतिसवाल केला आहे.
निवडणुका जाहीर झाल्या की, त्याबद्दल पत्रकारांना आम्ही आमचा फॉर्म्यूला काय आहे ते सांगणारच आहे असंही त्यांना यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर मंत्री मंडळाचा विस्तार होणार हे नक्की आहे. त्यातच काही वाचाळवीरांना बाजूला केलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.