बारामती : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि बारामतीच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू झालाय. बारामती-इंदापूर रस्त्यावरील खारा ओढ्याजवळ हा अपघात झाला.
या अपघातात ट्रॅक्टरचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्याखाली ट्रॅक्टर चालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इनोव्हा कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने आणखी मोठा अनर्थ टळला आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना बारामतीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ही घटना कळताच छत्रपती कारखान्याचे जेसीबी पथक ऊस तोड विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
खामगावात 3 गाड्या एकमेकींवर आदळल्या
बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ आज सकाळी 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव आणि बुलडाणाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला आहे. मालवाहू बोलेरो गाडी सोयाबीन पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या सुमो गाडीला धडकली तर बोलेरोच्या मागून सुद्धा भरधाव येणारी बोलेरो वाहन धडकून हा विचित्र अपघात घडला. यातील सर्व जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खामगावात 3 गाड्या एकमेकींवर आदळल्या, अपघातात तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमीhttps://t.co/rZKag9SsOC#Khamgaon #Buldhana #RoadAccidents
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
संबंधित बातम्या :
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला
VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड