अधिकारी मंत्र्यांच्या मागं फिरणारा नसावा, जिल्ह्याचं नाव करणारा असावा, जयंत पाटलांची फटकेबाजी

| Updated on: Oct 08, 2021 | 5:34 PM

मी पालकमंत्री झाल्या पासून जिल्ह्यात कसा चांगला अधिकारी आणता येईल हे पाहतो. कारण कोणताही शासकीय अधिकारी मंत्र्यांच्या मागे फिरणारा नसावा. तर तो काम करणारा असावा. गुणवत्ता वाढवून महाराष्ट्र मध्ये जिल्ह्याचं नाव करणारा असावा, असे जयंत पाटील म्हणाले.

अधिकारी मंत्र्यांच्या मागं फिरणारा नसावा, जिल्ह्याचं नाव करणारा असावा, जयंत पाटलांची फटकेबाजी
जयंत पाटील
Follow us on

सांगली: कोणताही शासकीय अधिकारी मंत्र्यांच्या माघे फिरणारा नसावा. तर तो काम करणारा असावा, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्तकेलं आहे. जयंत पाटील सांगली मध्ये जिल्हा परिषद तर्फे भरवण्यात आलेल्या शिक्षक गुणवत्ता प्रशिक्षण मध्ये ते बोलत होते.

कोणताही शासकीय अधिकारी मंत्र्यांच्या माघे फिरणारा नसावा. तर तो काम करणारा असावा. असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. सांगली जिल्हा परिषदने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी शिक्षक गुणवत्ता प्रशिक्षण भरवण्यात आले आहे. त्याची सुरवात आज पासून करण्यात आली. या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील हे उपस्थित होते.

चांगला अधिकारी सांगलीत कसा येईल हे पाहतो

मी पालकमंत्री झाल्या पासून जिल्ह्यात कसा चांगला अधिकारी आणता येईल हे पाहतो. कारण कोणताही शासकीय अधिकारी मंत्र्यांच्या मागे फिरणारा नसावा. तर तो काम करणारा असावा. गुणवत्ता वाढवून महाराष्ट्र मध्ये जिल्ह्याचं नाव करणारा असावा, असे जयंत पाटील म्हणाले. जिल्हा चांगला असावा असं वाटतं असेल तर चांगला अधिकारी असला पाहिजे. एका प्रांत अधिकाऱ्याचं चांगलं काम पाहून महसूल मंत्र्याना फोन करुन सांगली जिल्ह्यात त्यांना आणलं. केवळ मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागं धावणारा अधिकारी नसावा, असं जयंत पाटील म्हणाले. चांगला अधिकारी असल्यास डोक्याला ताण होत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्र सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी

महाराष्ट्र सरकार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतंय. पण केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये आतापर्यंत कसलाही सहभाग नाही याचा आम्हाला खेद वाटतो. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या मदतीवरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रावर टीका केसी होती. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागांत तीन वेळा अतिवृष्टी झाली. पण केंद्र सरकारचं पथक नुकसान पाहणी करण्यासाठी खूप उशिरा आलं असं जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? तोवर राज्य सरकारला जितकी मदत करणे शक्य आहे तितकी मदत सरकार करेल, असं जयंत पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

Aryan Khan Drug Case LIVE : कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब

Jayant Patil said Officer should be work for progress for development of district not present with minister