Video : ‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

| Updated on: Jan 29, 2022 | 5:22 PM

पीडित महिला रिक्षाचालक असून आरोपी जितेंद्र खाडे हा वारंवार तिला फोन करुन सेक्ससाठी महिलांची मागणी तिच्याकडे करायचा. अखेर महिलेने त्याला 24 जानेवारी रोजी रस्त्यात पकडला आणि आयटम पाहिजे ? असे विचारत रिक्षात घालून चपलेने चोपून काढला.

Video : त्या शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
'त्या' शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
Follow us on

विरार : महिलेकडे आयटमची मागणी केल्याप्रकरणी मारहाण झालेल्या ‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जितेंद्र खाडे (Jitendra Khade)असे कारवाई करण्यात आलेल्या शिवसेना विभागप्रमुखाचे नाव आहे. महिलेने चपलाने मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झाल्यानंतर पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी तडकाफडकी ही कारवाई केली आहे. विरार पूर्व साईनाथनगर येथील शिवसेना विभागप्रमुख जितेंद्र खाडे हा एका रिक्षाचालक महिलेला वारंवार फोन करून, महिला आयटम आहे का? अशी करत विचारणा होता. याला कंटाळून अखेर महिलेने जितू खाडे याला 24 जानेवारी रोजी पकडून रिक्षातच चपलाने बेदम चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र खाडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Jitendra Khade expelled from Shiv Sena party, Action after the beating video went viral)

आरोपी वारंवार महिलेला फोन करुन महिलांची मागणी करायचा

पीडित महिला रिक्षाचालक असून आरोपी जितेंद्र खाडे हा वारंवार तिला फोन करुन सेक्ससाठी महिलांची मागणी तिच्याकडे करायचा. अखेर महिलेने त्याला 24 जानेवारी रोजी रस्त्यात पकडला आणि आयटम पाहिजे ? असे विचारत रिक्षात घालून चपलेने चोपून काढला. रस्त्यावर जमलेल्या बघ्यांपैकी कुणीतरी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. त्यानंतर कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरार पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात खाडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून कारवाईचा बडगा

या घटनेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे. शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी जितू खाडेच्या कृतीचा निषेध केला असून खाडेच्या कृतीला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी पत्रक काढून खाडे याची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. (Jitendra Khade expelled from Shiv Sena party, Action after the beating video went viral)

इतर बातम्या

इम्रान मेहंदीला हर्सूलच्या अंडा सेलमधून बाहेर काढा, Aurangabad खंडपीठाचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद; पोलीस ठाण्यासमोरचं एकमेकांविरोधात भिडण्याचे कारण काय?