कोल्हापूर : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणि तिसऱ्या लाटेची (Corona third wave) भीती असताना, काही जिल्ह्यातून दिलासादायक चित्र येत समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur corona update) तब्बल 700 पेक्षा अधिक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचने अक्षरश: कहर माजवला होता. कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर हा केवळ राज्यातच नव्हे तर देशात अव्वल होता. शहरांमधून गावा गावांत कोरोना पसरल्यामुळे भीती वाढली होती. मात्र आता गावंच्या गावं कोरोनामुक्त होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 778 गावात गेल्या पंधरा दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. इतकंच नाही तर भुदरगड तालुक्यातील सर्वाधिक 109 गावं कोरोना मुक्त झाली आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारचे आदेश येताच या गावांमध्ये शाळांचे वर्ग भरणार आहेत.
दरम्यान, एकीकडे गावं कोरोनामुक्त होत असताना काही गावांमध्ये उद्रेक कायम आहे. करवीर तालुक्यात अजूनही सर्वाधिक 88 गाव कोरोनाबाधित आहेत.
दररोज अधिक प्रमाणात होणाऱ्या टेस्टिंगमुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे तसेच जास्त टेस्टिंग झाल्याने लक्षण नसलेले लोकसुद्धा (असिम्टमॅटिक पेशंट) मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे देखील संसर्ग रोखला गेला. शिवाय टेस्टिंगमुळे सौम्य लक्षण असणाऱ्यांना सुद्धा वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटलेलं पहायला मिळत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लसीचा पुरवठा कमी झाला तरच लसीकरणात व्यत्यय येतोय नाहीतर एरव्ही लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केंद्राच्या पथकाने 15 जुलैला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय पथकाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, लसीकरण केंद्रांना देखील भेटी दिल्या. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाने या पथकाला दिली.
संबंधित बातम्या