कोल्हापूर : कोल्हापूर शहर आज आगीच्या घटनेमुळे हादरलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी रोड परिसरातील एका दुकानाला भीषण आग लागली. आगीने अचानक पेट घेतला आणि पाहतापाहता अख्ख्या दुकानात ही आग धुमसली. आगीमुळे संपूर्ण दुकान अक्षरश: जळून खाक झालं. पण ही आग तिथपर्यंतच थांबली नाही. ही आग आजूबाजूच्या दुकानं आणि घरांपर्यंत पोहोचली. त्यामुळे परिसरात अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालं. अनेकांकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. काही स्थानिकांनी अग्निशनल दलाकडे याबाबत माहिती दिली.
संबंधित घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं. सुरुवातीला ही आग लवकर विझेल की नाही? याबाबत साशंकता होती. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी मारत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त काळ हा आगीचा थरार छत्रपती शिवाजी चौकात बघायला मिळाला.
कोल्हापुरात शिवाजी रोड परिसरात आज दुपारच्या वेळी एका दुकानाला भीषण आग लागली. आगीची घटना मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या. आगीला विझवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु झाले. आग लागली तिथे अनेक दुकानं आणि मोठी लोकवस्ती आहे. विशेष म्हणजे दुकानाच्या शेजारी असणाऱ्या घराला देखील आग लागली. त्यामुळे परिसरातील वातावरण अतिशय भीतीदायक बनलं. नागरिकांची धाकधूक वाढली.
सुरुवातीला आग विझवण्यात खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे ही आग लवकर विझणार की नाही, याबाबत भीती होती. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी अशक्य असलेली गोष्ट दोन तासात शक्य करुन दाखवली.
कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी रोड परिसरात ही दुर्घटना घडली. संबंधित परिसर हा प्रचंड गजबजलेला असतो. या भागात दाट वस्ती देखील आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचीदेखील धाकधूक वाढली. विशेष म्हणजे ही आग संबंधित दुकानाच्या बाजूच्या दुकानं आणि घरातही पोहोचली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.स आगीनंतर शिवाजी रोड परिसरात प्रचंड गर्दी जमली. परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. ही आग आणखी वाढू नये, यासाठी परिसरातील नागरीक सुद्धा प्रयत्न करु लागले.
अखेर अग्निशमन दलाच्या दहा बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमुळे चार दुकानांचं लाखोंचं नुकसान झालंय. तर आगीचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास झाला. आगीवर नियंत्रण मिळवत असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. या आगीत काही जीवितहानी झाल्याच्या माहिती सध्या तरी आलेली नाही. पण आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय.