गडचिरोली : सिंहस्थ कुंभमेळाच्या (Simhast Kumbh Mela ) दर्शनासाठी आलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सिरोंचा व कालेश्वर येथे दर्शन घेतले. त्यानंतर अनेक विकास मुद्द्यांवर चर्चा केली. तेलंगणा राज्यातून येणाऱ्या विद्युत टावर लाइनचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाचे आपण दखल घेऊन शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा, अशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करण्यात आली. टॉवर लाइनचे काम पूर्ण झाल्यास सिरोंचात (Sironcha) लोडशेडिंग (Loadshedding) किंवा विद्युत समस्येची समस्या राहणार नाही. तेलंगणा राज्यात दोन विद्युत लाईन सुरु झाल्यास यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या कामाची दखल घेतली जाईल अशी हमी दिली. ही मुद्दा टीव्ही नाईन मराठीनं उचलून धरलाय.
सिरोंचा तालुका महाराष्ट्रातील शेवटच्या तालुका आहे. आल्लापल्ली जवळपास शंभर किलोमीटर जंगलातून जवळपास 70-80 वर्षे जुनी असलेली लाईनवर सिरोंचाचा विद्युत कारभार चालतो. या जुन्या लाईनमुळे सिरोंचा तालुक्यातील व शहरातील अनेक समस्यांचा सामना या विद्युतमुळे करावा लागत आहे. जंगल क्षेत्र मोठा असल्यामुळे तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात जोडण्यासाठी टावर लाइनची मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे.
या कामाची तक्रार थेट महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. यावर शासनाने पाठपुरावा करावा, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, भाजपचे पदाधिकारी दामोदर अरिगेला, शंकर नरहरी यावेळी उपस्थित होते.