शेतकऱ्यांचे कोट्यवधी अनुदान बुडवणाऱ्या 35 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित, खामगाव बाजार समितीमधील मोठी कारवाई

| Updated on: Aug 08, 2021 | 9:28 AM

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं अनुदान बुडवणाऱ्या 35 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. खामगाव बाजार समितीमधील ही मोठी कारवाई समोर आलीय.

शेतकऱ्यांचे कोट्यवधी अनुदान बुडवणाऱ्या 35 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित, खामगाव बाजार समितीमधील मोठी कारवाई
Follow us on

बुलडाणा : राज्य शासनाने अधिक अनुदान जाहीर करुनही खामगाव बाजार समिती मधील अडत्यांनी मनमानी पद्धतीने हिशोब पट्ट्या बाजार समितीला दिल्याने तब्बल 10 हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान थकलं. या सर्व प्रकाराला जबाबदार धरुन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं अनुदान बुडवणाऱ्या 35 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेत.

नेमका काय आहे प्रकार?

बुलडाणा जिल्ह्यात 2017 साली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शासनाने प्रति क्विंंटल 200 रुपये प्रमाणे प्रत्येकी 25 क्विंटल पर्यंत अनुदान जाहीर केले होते.. मात्र खामगाव बाजार समिती मधील अडत्यांनी मनमानी पद्धतीने अप्रमाणित हिशोब पट्ट्या बाजार समितीला दिल्याने तब्बल 10 हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान थकले आहे…

35 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे अनुदान गेल्या 4 वर्षांपासून मिळाले नाही.. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नंदू भट्टड यांनी तक्रार केल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी 35 अडत्यांवर कारवाई करण्यात आली असून या सर्व अडत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

बाजार समिती कर्मचाऱ्यांना मात्र जाणीवपूर्वक कारवाईतून वगळलं!

या व्यापाऱ्यांनी प्रमाणित हिशोब पट्ट्या न दिल्यानेच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान 4 वर्षांपासून थकले आहे.. त्यामुळे ही मोठी कारवाई या व्यापाऱ्यांवर करण्यात आलीय.. मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या बाजार समिती कर्मचाऱ्यांना मात्र जाणीवपूर्वक या कारवाईतून वगळण्यात आलेय.

(Licenses of 35 traders suspended for squandering over farmers subsidies Buldhana Khamgaon Market)

हे ही वाचा :

घरची परिस्थिती हालाखीची, त्यात कोरोनाची वक्रदृष्टी, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट, जागाच मिळत नसल्याने धंदा बसला