मुंबई : आज शनिवार 9 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ इथला तलाव फुटून आज मोठे नुकसान झाले होते, त्या नंतर नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी अप्पाराव पेठ या दुर्गंम भागातील गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधलाय. या दुर्घटनेत गावकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी अपाराव पेठ इथल्या ग्रामस्थांना आश्वासीत केलंय. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समराजस्या जाणून घेतल्या.
नाशिकच्या बागलाणच्या साल्हेर किल्ल्यावर दोन पर्यटकांचा पाय घसरून दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील थुगाव पिपरी ते कुऱ्हा पुलाजवळ अडकल्या 10 मजुरांची गावकऱ्यांच्या पुढाकाराने अखेर सुटका. एका मोठ्या नाल्याला पूर आल्याने दुपार पासून मजूर पडले होते अडकून….
शारजाहमधून कोची विमानतळावर आलेल्या विमानात लँडिंग दरम्यान बिघाड
विमानात 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते
विमानामध्ये हायड्रोलिक बिघाड
कोची विमानतळावर विमानाचे सुखरूप लँडिंग
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित
कसारा जवळील उंबरमाळी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले
झाड कोसळल्यामुळे वायर मधून होतेय स्पार्किंग
आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी उमरमाडी स्टेशन मास्तरांना दिली माहिती
ओव्हरहेडचा विद्युत सप्लाय केला बंद
यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पंचवटी एक्स्प्रेस उंबरमाळी स्टेशनवर उभी असून लोकलही आउटर उभी आहे
वाहतूक सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता
मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
झाड काढायचे प्रयत्न सुरू
सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना अचानक रद्द करणं पूर्णपणे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे, यासंदर्भात मी सीएमशी बोलणार आहे. तसेच राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमधून आमदारांच्या जेवणावळी उठवत आहेत, हे बरोबर नाही, जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील थुगाव पिपरी ते कुऱ्हा पुलाजवळ 10 मजूर अडकले. एका मोठ्या नाल्याला पूर आल्याने दुपार पासून मजूर अडकल्याची माहिती. पुलाचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना फटका बसतोय.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांचं बैठकीत केलं कौतुक
तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात
पाटील तर जीवाची पर्वा न करता तिकडून आले
ते म्हणतायेत आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो तर आपण घेतलेले निर्णय रद्द केले
उस्मानाबादचं आपण धाराशिव केलं होतं औरंगाबादचं संभाजीनगर केलं
हे कसलं त्यांच हिंदुत्व
पाऊस उघडल्यानंतर मराठवाड्यात येणार
पक्षासाठी काम करा पक्ष संघटना मजबूत करा
आपण सगळे ताकदीनं पुढे जाऊयात
भाजपनं त्यावेळी दिलेला शब्द पाळला असता तर आज ही वेळ आली नसती
आता माझ्याकडे फक्त तुमची ताकद आहे
तुम्ही सगळे आहात आपण पुन्हा एकदा संघटना मजबूत करूयात
उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच वक्तव्य
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. पूर आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्यात.
इंग्रजी माध्यमांतील शाळा प्रवेशाचा ट्रेंड यंदा बदललाय, या वर्षी ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल एक हजार 952 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेचा निरोप घेतला आहे, तसेच हे विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळले आहेत, या सर्वांनी पुढील शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
ठाकरे सरकारने सभागृहाचा विश्वास गमावला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये कुठलाही निर्णय घेता येत नाही. बहुमत सिद्ध होण्याआधी कुठलाही महत्वाचा निर्णय घेणे हे अयोग्य आहे. आता ही नावच द्याची असल्याने आमचा तोच अजेंडा असल्याने आता आम्ही देऊ. ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्या सरकारच्या कॅबिनटसमोर ती नावं ठेवण्यात येतील. आमचं सरकार हे तिन्ही निर्णय घेईल. त्यांना कॅबिनेटमध्येही बहुमत नव्हतं. काही लोक तिथं बाजुने होते. बाहेर बरोबर नव्हते. अनेक लोक दुटप्पी बोलत आहेत. मात्र आमचा निर्णय ठाम आहे.
आम्ही दोघेच असून सगळीकडे जात आहोत. आम्ही निर्णय घेत आहोत. त्यांनी पाच मंत्र्यांच्या भरोसे सव्वा महिना काढला. त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. ज्या लोकांना ओबीसांना राजकीय आरक्षण द्यायचं नाही ते लोक जाणीवपूर्वक अडचण निर्माण करत आहेत. ज्यांच्या काळात हा आयोग झाला तेच लोक आता वेगळी भूमिका घेत आहेत.
मी राज ठाकरेंना भेटणार होतो हे मी आधीच सांगितलं होतं. मात्र आता त्यावरून विरोधकांना मळमळ होण्याचे कारण नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करतोय. मात्र ज्यांना बघवत नाही. ते अमित ठाकरे यांना आमूक देणार, अशा अफवा पसरवतात.
आम्ही काहीही बोलले, मात्र देवीने कुणाचा बळी घेतला हे आपण पाहिलं आहे. आता काहीही बोलत आहेत. बोलत आहेत. यातला एकही निवडून येणार नाही. पण मी सांगतो यातला एकही माणूस पराभूत होणार नाही. यातला एकही माणूस पराभूत झाला तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल. तुमच्या मतदारसंघात एकही काम शिल्लक राहणार नाही. थोडीफार कामं शिल्लक ठेवा, नाहीतर नंतर विसरतील लोकं.
सत्तेत असताना एवढी कामं करा की तुम्हाला पाहून काही लोकं तरी थांबले पाहिजेत. माझ्याकडून जे काही होईल. ते चांगलं होईल. माणूस जन्माला आलाय तर जाणारच आहे. मात्र या दोन दैवतांच्या फोटोला नमन केल्याशिवाय कोणतं काम सुरू होत नाही.
मला पंतप्रधानांनी माझं भाषण पूर्ण ऐकल्याचे सांगितलं. मी मनापासून बोललो म्हणून त्यांनी ऐकल्याचे सांगितले. काल आम्ही लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले आहेत. लोकांच्या गरजेसाठी आम्ही सर्वकाही करु. मी जिथे जातो तिथे माझं काम सुरू असतं. मी लिहिलेला शब्द अधिकाऱ्यांना पाळावा लागतो.
मी किती काळ आहे हे तुम्ही ठरवणारे कोण, याची चिंता जनता करेल. जनतेने त्यांचा निर्णय केला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या चार मागण्या फेटाळल्या. तरी असे बोलत आहेत. त्यांना कोर्टाने पळवून लावलं. इकडे बोलतात आम्ही जिंकलो. अरे तुम्हीला तोंड लपवून पळावं लागलं. जिंकलो आम्ही आणि फटाके ते वाजवत आहेत, हसावं की रडावं हे कळेना. यांच्यात भांडणं होतील म्हणून देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण हे एकमेकांच्या मानगुटीवर बसणार नाहीत. विरोधकांच्या मानगुटीवर नक्कीच बसतील.
आम्हाला कोणतीही तोडफोड करायची नाही. मात्र मी असाच बसलो नाही. माझ्याकडे खूप काही पर्याय आहेत. माझ्याकडे असलेले सर्व कलाकार लोक आहेत. त्यांची कलाकारी तुम्हाला कळणार पण नाही.
जी भूमिका घेतली आहे. ती राज्यातल्या लोकांनी स्वीकारली आहे. विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याचा ओघ असतो, मात्र इकडे उलटं झालं. लोकं सत्तेतून बाहेर पडले. मला खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. भाजपलाही बदनाम करण्याचं काम केलं. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. उद्या त्यांना निवडून यायचं आहे त्या पन्नास लोकांसाठी आम्ही आलो आहे. कामं केली नसती तर लोकांनी निवडून दिलं असतं का, आजचा मतदार खूप हुशार आहे. मी पाच वेळा समजावलं मात्र त्यात मला अपयश आलं. मग शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. अडीच वर्षात शिवसैनिकांच्या जीवनात काय बदल घडला का? मला कळलं तेव्हा मी थोडा निधी द्यायला लागलो. मात्र तेही काही लोकांना पटलं नाही.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पक्ष हा चार नंबरवर गेला. याचा विचार करायला हवा. आपला पक्ष आपण मोठा करण्यासाठी समोरच्या माणसाने सांगितलेलं ऐकलं पाहिजे. काही शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरे जावं लागलं. मात्र आम्ही सरकारमध्ये असून त्यांना वाचवू शकलो नाही. मी ऐकून घ्यायचो, मी वेळ द्यायचो. मला अधिकार नव्हते. आता हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्या आशीर्वादाने मंत्री आहे. पंतप्रधांनी याबाबत माहिती घेतल्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. मी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. मी सांगितलंय, मी एकटा मुख्यमंत्री नाही. तुम्ही सर्व लोक मुख्यमंत्री आहात. आता मी लोकांना ऐकतोय. जेवढं जमेल तेवढा न्याय देतोय. शिवसैनिकांचं खच्चीकरण यापुढे होऊ देणार नाही. शिवसैनिकांवर खोट्या केस तर दूरची गोष्ट आहे.
या एकनाथ शिंदेवर शंभरपेक्षा जास्त केसेस आहेत. वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी चाळीस दिवस जेलमध्ये होतो. आमच्या बापांची नावं घेतली. माझ्या मुलांकडेही वेळ देता आला नाही. माझ्या परिवाराने मला साथ दिली. प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी दिला म्हणून शिवसेना मोठी झाली. याच लोकांना बाळासाहेबांना मोठं केलं आणि याच लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली.
एवढा प्रवास केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जो उत्साह दिसतोय ते पाहून कळते की जबरदस्ती करून आणलेली ही माणसं नाहीत ही माणसं प्रेमाने आलेली आहेत. मला अब्दुल सत्तार म्हणाले आपण सिल्लोडला एक सर्वात मोठा मेळावा करू मी म्हटलं पाऊस आहे, म्हणाले मोठा मंडप टाकू 50 हजार माणसं येतील. एकीकडे सत्ता असते, एकीकडे मोठमोठे नेते असतात, एकीकडे सरकार असतं यंत्रणा असते आणि सत्तेमध्ये आपण असताना आपण स्वतः सोडून ज्याच्याकडे काहीच नाही त्या एकनाथ शिंदेच्या विश्वासाची सोबत करतात ही राज्यातली नाही, देशातली नाही, जगातली सर्वात मोठी घटना आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची नोंद जगभरातील अनेक देशांनी घेतली आहे. सगळीकडे टीव्ही लावला की टीव्ही मध्ये एकनाथ शिंदे आणि आमचे आमदार पन्नास एवढेच दिसायचं.
मात्र तरीही लोकांना सांगत आहेत जबरदस्तीने लपवून नेलं, मी तर नितीन देशमुख यांना मी स्पेशल विमान करून परत पाठवलं, आणखी काही नाव व त्यांनी दिले असती तर त्यांनाही तसंच परत पाठवलं असतं, ते आमच्याबद्दल काय काय बोलले हे आपल्याला माहिती आहे. बरेच लोक बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी राजकीय आत्महत्या केली मात्र मी त्यावेळेस आपण आमदारांना सांगितलं होतं तुम्ही 50 लोक आहात माझी मला काळजी नाही, मला माझ्या राजकीय जीवनाची काळजी नाही, परंतु मला तुमच्या 50 लोकांची काळजी आहे, जेव्हा मला असं वाटेल की तुमचं नुकसान होतंय, त्यावेळेस एकच शब्द लक्षात ठेवा माझा की ही सगळी जबाबदारी मी माझ्या एकट्यावर घेईन. तुम्हाला याच्यातून कुठलेही नुकसान होणार नाही, तुमचं राजकीय करिअर आबादीत ठेवण्यासाठी वाटेल ती करण्याची माझी तयारी आहे. ही साधी सोपी गोष्ट नाही. आम्ही संयम बाळगत होतो. इकडे आमच्याशी चर्चा करायला पाठवत होते तिकडे आम्हाला पदावरून काढत होते, पण आमच्याकडे बहुमत होतं लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आकड्यांना महत्त्व असतं, या देशात घटना आहे, या देशात कायदा आहे. या देशात नियम आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही, इकडे पदावरून काढायचं गटनेता बदलायचा आणि चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे वागायचं आणि तिकडे चर्चेला पाठवायचं, इकडे म्हणायचे पुतळे जाळा, माझ्या घरावरती दगडफेक करायला सांगायचे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या सरी सुरू आहेत. अशातच खामुंडी गावातील केशव क्षीरसागर या शेतकऱ्याचे राहते घर भर पावसात कोसळल्याची घटना घडली. जुन्नर परिसरात मागील आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात ठिकठिकाणी दुर्दैवी घटना घडत असतानाच खामुंडी गावातील शेतकऱ्याचा संसार भर पावसात उघड्यावर आलाय.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने होत आहे वाढ,
परिणामी सातही दारे पुन्हा एकदा एक मीटरने उघडली,
चंद्रपूर शहरालगतच्या वस्त्यांना देण्यात आला अतिसतर्कतेचा इशारा,
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई- वर्धा या नद्यांनी या प्रवाही पाण्यामुळे सोडले आहे पात्र,
हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली असल्याने पिके कुजण्याची भीती,
इरई धरणातील पाण्याचा विसर्ग 489 क्यूमेक्स एवढा,
यापुढच्या काळातही धरणातील पातळी कायम ठेवण्यासाठी दारे उघडी राहण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री होतो आता विरोधी पक्षनेता आहे. सभे अगोदर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीने नुकसान झाल्याचा अहवाल द्यायचा आहे. भंडारदरा , मुळा , निळवंडे धरणाचा साठा मागील वर्षापेक्षा काही प्रमाणात जास्त आहे. मागील विधानसभेला आवाहन केल्यानंतर किरण लहामटे तसेच जिल्ह्यातील अनेक आमदार निवडून दिले. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली त्यामुळे उद्धवजींकडून पाचशे कोटी निधी अकोले तालुक्याला दिला. अनेक विकासकामे केली. भविष्यात मुळा नदीवर आणखी एक धरण करण्याची मागणी आहे. पावसाचे पाणी अडवल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यानी दिली आहे.
महाविकास आघाडीतील मोठे नेते असल्याने भेट घेतली
विदर्भातील पूर परिस्थिती आणि विदर्भातील समस्या सांगण्यासाठी भेट घेतली असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं
राष्ट्रवादीत जाण्यासंदर्भात भेट नाही
मोठे नेते असल्याने विदर्भातील परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली
सरकार स्थापन झालं मात्र अजून मंत्री नाहीत याबाबत सुद्धा चर्चा झाली
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियमवर होणार आहे. त्याच उद्घाटन पवार यांनी करावं यासाठी निमंत्रण देण्यात आलं.
उदघाटन त्यांनी करावं अशी विनंती केली त्याला त्यांनी होकार दिला, तसेच 2-3 दिवसात ते निश्चित कळवणार आहेत, असेही सांगण्यात आलं. ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात सुद्धा त्यांना सांगण्यात आलं. ओबीसी आरक्षणचा प्रश्न कोर्टात असल्याने त्यावर चर्चा झाली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
– जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही तोपर्यंत मी पुराचा आढावा घेत आहे
– सिन्नरच्या एका गावात 0 ओबीसी दाखवण्यात आले होते
– आम्ही चौकशी केले असता सरपंच यांच्यासह अनेक जण ओबीसी असल्याचे समजले
– आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळालं पाहिजे
– ओबीसी समजाच हा 54 टक्के आहे ओबीसी समजाची जनगणना करा
– ओबीसी समजाचा आरक्षण कमी होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांनी घ्यावे
– सध्या पोरखेळ सुरू आहे नगराध्यक्ष हे जनतेतून आणि मुख्यमंत्री फुटीर शिवसेना गटातून होणार हे मोठी गमत आहे
– मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्र्यांचा हे जे सरकार आहे ते भाजपाच्या केंद्राचा सरकार पेक्षा हुशार निघाला
– पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी करून इतर वस्तुवरील gst वाढवला
– अंगावरचे सर्व कपडे काढून घेतले आणि लांगोटी दिली असा प्रकार आहे
– भारत सरकारच्या विरोधात मी काय बोलणार
– सगळे शब्द असंसदीय झाले तर खासदारांना नवीन शब्द शोधावे लागतील
– राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेतील काय फक्त हवा पाण्याची चर्चा होणार नाही
– राजकीय चर्चा देखील होतीलच
राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस कऱण्यासाठी देवेंद्र फडणवीस निवासस्थानी दाखल झाले आहेत. दीड तास त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. फडणवीसांचा राज ठाकरे यांनी सत्कार देखील केला आहे. त्यावेळी मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिद्धी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत
औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी चंद्रकांत खैरे आक्रमक
नाव बदलण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी दिला सरकारला एक महिन्याच्या अलटीमेटम
एक महिन्यात केंद्रातून नाव बदलून आना अन्यथा जशास तसे उत्तर देऊ
एक महिन्यात नाव नाही बदलले तर रस्त्यावर उतरणार
चंद्रकांत खैरे यांचा शिंदे सरकारला गंभीर ईशारा
मुंबई :- नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ३८ पेक्षा जास्त आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर म्हस्के यांची या पदावरून हकालपट्टी करत असल्याचे ‘सामना’ दैनिकातून ज़ाहीर करण्यात आले होते. मात्र, ही हकालपट्टी आता बेकायदेशीर ठरवून धुडकावण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गिय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत , असे स्पष्ट करत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत.
केंद्र सरकारने संसदेच्या आवारात आंदोलन, निदर्शने, उपोषण आदी करण्यास बंदी घातली.सनदशीर मार्गाने विरोध दर्शविण्याचा हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा मार्ग अशा रितीने सरकारने बंद केला.हे अतिशय दुर्दैवी आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवारांचा ताफा अडवला…
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील घटना…
शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अटक केल्याचा निषेध…
दशरथ सावंत यांना पोलीसांनी अजित पवारांना भेट नाकारली…
सकाळीच दशरथ सावंत यांना घेतलय ताब्यात…
शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अडवला ताफा…
पोलीसांना आंदोलकांना हटवले…
अजीत पवारांसमोर पिचड समर्थंकाकडून पिचड साहेब जिंदाबादच्या घोषणा…
अजित पवार पोहचले सभास्थळी…
मराठा आरक्षण प्रकरणी विनोद पाटील पुन्हा एक्शन मोडवर
मराठा आरक्षण प्रश्नी विनोद पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
येत्या आठवड्यात शिष्टमंडळाला सोबत घेऊन विनोद पाटील घेणार एकनाथ शिंदे यांची भेट
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या सोयी सुविधांसाठी घेणार भेट
शरद पवार यांच्याबाबत मी कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. समजा मी काय बोललो असलो तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पवार साहेबांनी तो राजीनामा स्विकारला नाही. जितेंद्र आव्हाडांनी मला स्टेजवरती येऊ नका असा मेसेज दिला. मी जर का काय बोललो असलो तर त्याबाबत मी पवार साहेबांच्या घरी जाऊन माफी मागेन. नेत्यांवर निष्ठा आहे आणि ठेवावी. मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. राणे साहेबांशी बोलेन जे काय बोलायचं आहे. ते मी बोलीन…कार्य पद्धतीवर आक्षेप आहे. आमचं याच्यापुढे महाराष्ट्राच्या हिताचं बोलण असेल. मी कायम माझी भूमिका मांडत राहिलो आहे. त्यामुळे प्रत्येकाला मर्यादा असतात. शरद पवार हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. मला त्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी द्यावं. मी आत्तापर्यंत ज्या काही बोललं आहे. पवार साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेलो नाही .
– भाजप आमदार राम शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अग्रदूत बंगल्यावर दाखल
– मी आज मुख्यमंत्र्यांची सदीच्छा भेट घेण्यासाठी पोहोचलो आहे…
– संजय राऊत यांच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्याचा कारभार व्यवस्थित हाकतील… ते सक्षम आहे, कुणाच्या पोचपावतीची आम्हाला गरज नाही…
– लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल…
आज राजधानी दिल्ली त देशभरातील सर्व विधानसभा अध्यक्ष
संसद भवन परिसरामध्ये देशभरातील सर्व विधानसभाध्यक्षांचं होणार सम्मेलन
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला दुपारी 12 वाजता करणार उद्घाटन
विधानसभा सभागृहातील मुद्द्यावर होणार चर्चा
पक्षांतर बंदी कायदा आणि नियमांवर चर्चा होणार
सभागृहातील शालीनता आणि नियम यावर देखील होणार चर्चा
विधानसभांमध्ये जनतेची भागीदारी वाढवण्यासाठी केले जाणार प्रयत्न
मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला…
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घटना…
देवगाव येथे सकाळी फुटलाय बंधारा…
कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वायाला…
पिण्यासाठी सोडलेले पाणी गेले वाया…
शेतकऱ्यांचेही झाले मोठे नुकसान…
राहुरीत मुळा धरणातून सोडले होते पाणी…
कालवा फुटल्याने पाणी करण्यात आले बंद….
-गोंदियात शहरात मुसळधार पावसामुळे नागरीकांच्या घरात शिरले पाणी….
-शहरातील रस्ते झाले जलमय….
-रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची कसरत…..
-नगर परीषदेचे नियोजनशुन्य धोरण…
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंचा जबरा चाहता; सोलापुरी चादरीवर विनले मुंडेंचे छायाचित्र
-मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील पाचशे ते सहाशे लोकांना देणार चादर भेट
आपण देशात कोठेही आंदोलन करु शकतो
संसदेत शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक वर्षे आंदोलन केलीत
यावर बंदी आणणे ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे
या निर्णयाचा निषेध करते
औरंगाबाद संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं धाराशीव केलं. मुंबईतल्या विमानतळाला दि बा पाटील यांचं नावं दिलं. नामकरण आणि इतर गोष्टीसाठी ही लोक आंदोलन करीत होते. हे सरकार बेकायदेशीर आहे. या सरकारबाबतचा निर्णय अद्याप कोर्टात आहे. लोकांची भावना आहे. लोकांचा आग्रह आहे. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता. पवार साहेबांशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही गद्दार नाही. त्यामुळे आम्ही प्रयत्न करीत आहोत. शिवसेना संपवणारे भाजपसोबत गेले आहेत, त्यांचं त्यांना लक लाभो
– पुणे जिल्ह्यात 38 टक्के पेरण्या पूर्ण,
– जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्र एक लाख 95 हजार 710 हेक्टर,
– यापैकी 73 हजार 808 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण,
– यामध्ये भात, मका, भुईमूग, सोयाबीन, बाजरी पिकाची पेरणी करण्यात आलीय,
– यंदा पेरण्यांमध्ये वाढ झाली असून एकूण क्षेत्र 29 हजार 283 हेक्टरवर गेले आहे
18 जुलै पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
संसद परिसरात आंदोलन करण्यास मनाई
उपोषण निदर्शने धरणे आंदोलन करायला मनाई
संसद प्रशासनाकडून नोटीस जारी
– भंडाऱ्यात पाऊस मुसळधार मात्र शेतीला पोषक.
– जिल्ह्यात या वर्षी 1 लाख 84 हजार हेक्टर वर धान पिकाची लागवड केली जात आहे.
– ज्या शेतकऱ्यांन कड़े सिंचनाची व्यवस्था आहे.अश्या २०% टक्के शेतकऱ्यांची धान लागवड झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांन कडे सिंचनाची सोय नाही अश्या शेतकऱ्यांन साठी हा पाऊस समाधानकारक आहे.
जून्नरच्या बारव गावात राहत्या घरात शिरला नाग
अंगावर काटा आणणारं नागाचं रेस्क्यू ऑपरेशन
रमेश खरमाले यांंनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर पकडलं नागाला
नागानं काढला फणा पाहणाऱ्यांच्याही अंगावर आला काटा
नागाला पकडून जंगलात दिलं सोडून
पावसाळ्याच्या दिवसात नाग घरात येण्याची शक्यता ग्रामीण भागात काळजी घेण्याचं सर्पमित्रांच आवाहन …
कॅनॉट प्लेस भागात एका रेस्टॉरंटला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यात यश
आऊटर सर्कल जवळच्या रेस्टॉरंटला लागली होती आग
-आगामी महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाने 5 दिवस मुदतवाढ दिलीय
-आता महापालिकेची अंतिम मतदार यादी 21 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे
-महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर 8 हजार 700 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्याचा निपटारा करण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय.
अहमदनगर धरणातील धरणसाठा –
भंडारदरा धरण – 65% (11 टिएमसी )
निळवंडे धरण – 70% ( 8 टिएमसी )
मुळा धरण – 50% ( 26 टिएमसी )
कोरोना काळात भारताकडून जगभरात लसीचा पुरवठा
भारताकडून तब्बल 98 देशांना कोविड-19 लसींचा पुरवठा
235 दशलक्ष पेक्षा जास्त पुरवठा केल्याची NITI आयोगाची माहिती
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला,
जिल्ह्यात काल रात्रीपासुन पावसाने घेतली विश्रांती, आभाळ मात्र ढगाळलेले,
गेले सात दिवस चंद्रपूरकरांना सूर्यदर्शन नाहीच,
जिल्ह्यातील तेलंगणाला जोडणारा राजुरा शहराजवळील वर्धा नदी पूल मात्र अद्याप पाण्याखाली,
चंद्रपूर शहरातील रहमतनगर -सहारा पार्क- राज नगर भागातील पूर अंशतः उतरण्यास सुरुवात,
चंद्रपूर शहरालगतच्या धरणाची सातही दारे 0.25 मीटर्स ने आहेत खुली,
जिल्ह्यातील वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची आवक सुरू,
गोंडपिपरी तालुक्यातील आष्टी येथील पुलावर 2 फूट पाणी असल्याने चंद्रपूर-अहेरी मार्ग बंदच
-पवनानगरच्या बेडसे येथे विजेचा शॉक लागून दोन गाईंचा मृत्यु
-बेडसे गावातील तिखे वस्ती येथे विजेच्या तारा रस्त्यावर पडल्याने शेतकरी संजय शिर्के यांच्या दोन गायींना तारेचा शॉक लागून जागीच मृत्यु झाला आहे
-यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दुभत्या गायी गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे
नाशिक -गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार
जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस
११ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
पुण्यातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर
पेट्रोल 105.83
पॉवर पेट्रोल 111.49
डिझेल 92.36
सीएनजी 85. 00
कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाची उघडीप
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम
नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने होतेय वाढ
पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 37 फूट आठ इंचावर
पावसानं उघडीप दिल्यान काहीसा दिलासा
पुणे महापालिकेने केलं आजपासून बूस्टर डोस देण्याचे नियोजन
कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना देण्यात येणार बुस्टर डोस
महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने या 68 ठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड या दोन्ही लसीचे डोस
नाशिक -नाशिक जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे नुकसान
-जवळपास १२०० हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
-सोयाबीन व मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान
-जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू असल्याने, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता
गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता व गोदावरी दोन नदियां महापूर आलेला आहे एक भीषण परिस्थिती प्राणहिता आणि गोदावरी नदी काठावरील गावांची झालेली आहे
आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशाप्रकारे पाणी प्राणहिता नदी जवळपास पाच किलोमीटरपर्यंत दिसत आहे
दुसरीकडे गोदावरी नदीच्या पाणी वाढत असल्यामुळे तेलंगाना सीमावर्ती वसलेल्या देशातील सर्वात मोठा वाटर प्लांट कालेश्वरम लिफ्ट एरीकेशन पाण्याखाली गेलेला आहे
अमरावती-उमेश कोल्हे हत्या प्रकरणामुळे अमरावती सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी अचलपूर व परतवाडामध्ये जमावबंदी लागू केली आहे.अमरावती जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर परतवाडा शहरात आज पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण व जयपूर येथील कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज शक्ती फाउंडेशनच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शहरातील काही भागांत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. यामध्ये शहरातील ज्येष्ठ चौक, दुरानी चौक, पेन्शनपुरा महावीर चौक, संभाजी चौक लालपुर या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून.
दोन्ही तरुण मध्यप्रदेश राज्यातील.
एक बचावला, दुसरा बेपत्ता.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील घटना
गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात येत आज पहाटे पासून शोधकार्य सुरु आहे।
– पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून
– सततच्या संततधार पावसामुळे बुब्रा नदिला पुर आलाय,
– संततधार पावसामुळे बुब्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
– नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
– पावसाची जोरदार बँटींग अद्यापही सुरूच असल्याने नदिच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता
– प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या हि सुचना केल्यात
गडचिरोली -मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यात सर्वात जास्त 26 लाख 85 हजार 390 क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे
जिल्ह्यातील 20 ते 25 गावांमध्ये पुराच्या पाणी
सिरोंचा तालुक्यातील जास्त गावांना पुराचा फटका
सध्या जिल्ह्यात पाऊस रिमझिम झाला तरी पाऊस सुरूच आहे
– रामटेक मतदारसंघाचा संजय राऊत यांच्याकडून आढावा
– शिंदे गटातील आमदार आशिष जैसवाल यांच्या मतदारसंघात संजय राऊत घेत आहेत आढावा
– रामटेक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांनी जाणून घेतली रिॲलीटी
– शिवसेनेतील पडझड थांबलण्यासाठी संजय राऊत यांचे प्रयत्न
पुरंदर : वीर धरणाच्या पाणी पातळीत होतेय वाढ..
– वीर धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा..
– नीरा नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा..
– वीरमधून १०८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग..
– धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे वीरसह भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी धरणात मुबलक पाणीसाठा..
नांदेड – नांदेडमध्ये कालपासून पाऊस ओसरलाय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झालीय. मात्र पुरसदृश्य स्थितीने पैनगंगा नदिवरच्या सहस्त्रकुंड धबधब्याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलंय, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पुढच्या दोन दिवसांसाठी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. धबधब्याचे पाणी आता प्रचंड वेगाने वाहत असल्याने इथे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी किनवटच्या तहसीलदारांनी रात्री हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथे आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पर्यटकांनी पुढचे दोन दिवस येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नांदेड-हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस बरसतोय, त्यामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहतेय. त्याचाच परिणाम म्हणून सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात मोठी वाढ झालीय, त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या पुणे जिल्ह्यातील 533 जणांना मिळणार पेंशन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे नव्याने अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर
यासाठी आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी 3 जुलै 2018 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक
राज्यात एसटी बस आता सीएनजीवर धावणार
राज्यातील 1 हजार एसटी गाड्यांचे डिझेल वरून सीएनजीमध्ये रूपांतर करुन प्रोटोटाईप बनविण्याचे देखील काम सुरु
येत्या महिन्याभरात सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात सीएनजी बसविण्याचे काम होणार
पहिल्या टप्यांत पुणे विभागातील तीन आगारांचा यात समावेश
राजगुरुनगर, शिरूर व बारामती हे तीन आगार सीएनजीसाठी निवडले
टोरॅन्टो गॅस कंपनीकडून या विभागांना गॅसचा पुरवठा होणार
या तिन्ही विभागाचे दर महिन्याला प्रत्येकी 30 एसटीगाड्या डिझेल वरून सीएनजी मध्ये रूपांतर केले जाणार
दुसऱ्या टप्यांत शहरी भागांतील आगरांचा समावेश केला जाईल
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला इंग्रजी माध्यमांतील शाळा प्रवेशाचा ट्रेंड यंदा बदलला
-23 या चालू शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल एक हजार 952 विद्यार्थ्यांनी आपापल्या इंग्रजी शाळेचा निरोप घेतला
या 1 हजार 952 विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी जिल्हापरिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला
चालू शैक्षणिक वर्षात मराठी शाळांकडे वळलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक 386 तर, सर्वात कमी वेल्हे तालुक्यातील केवळ सहा विद्यार्थ्यांचा समावेश
वाहत्या पाण्यात तोल गेल्याने ईसमाचा बुडून मृत्यु.
तुमसर तालुक्यातील खापा- विहीरगाव शेतशिवारातील नाल्यावरील पुलावरून वाहनाऱ्या नाल्याच्या पाण्यात तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला.
राजेश रामसंजीवन पांडे (48 )रा हसारा ता तुमसर असे मृतक ईसमाचे नाव आहे
कोरोनानंतर खुले करण्यात आलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे पहिल्या तिमाहीत विक्रमी उत्पन्न
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात प्राणी संग्रहायाला 2 कोटी 51 लाख 10 हजार 900 रुपयांचे उत्पन्न प्राप्त
यामध्ये तिकीटदरांतून मिळालेले उत्पन्न हे 2 कोटी 45 लाख 33 हजार 295 रुपये तर बॅटरीवरील गाडीसाठी आकारण्यात आलेल्या दरातून 5 लाख 77 हजार 605 रुपये
या तीन महिन्यात एकूण 7 लाख 13 हजार 824भारतीय तर 290 पर्यटकांनी दिली प्राणी संग्रहायला भेट
सततच्या पावसामुळे कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बीड ते महे बंधाऱ्यावर पाणी
नदीकाठची शेती देखील गेली पाण्याखाली
पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची उसंत
गुरुवारी दिवसभरात शहरात केवळ 9.4 मिमी पावसाची नोंद
तर शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चारही धरणांत मिळून 14.68 टीएमसी पाणीसाठा जमा
हा साठा एकूण क्षमतेच्या 50 टक्के तर जिल्ह्यातील धरणे 40 टक्के भरली