One Billion Dollar ची बनावट नोट, 750 कोटींची किंमत भासवत विक्रीचा प्रयत्न, नांदेडमध्ये टोळी जेरबंद

| Updated on: Mar 30, 2022 | 8:40 AM

आपल्याकडे "एक बिलियन डॉलर्सची नोट (भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये) असल्याचे सांगून टोळीचे सदस्य ती नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करत होते

One Billion Dollar ची बनावट नोट, 750 कोटींची किंमत भासवत विक्रीचा प्रयत्न, नांदेडमध्ये टोळी जेरबंद
एक बिलियन डॉलरची बनावट नोट
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नांदेड : अमेरिकन डॉलरची बनावट नोट (Fake Currency) दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीआहे. वेळप्रसंगी भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करुन रक्कम पळवणे, असाही त्यांचा हेतू होता. नांदेडमध्ये (Nanded Crime) आलेल्या तेलंगणातील या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त करण्यात आली आहे. या नोटेची भारतीय चलनातील किंमत साडेसातशे कोटी रुपये असल्याचे आरोपींने भासवले होते. आरोपींकडून कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघा जणांना पोलिसांनी अटक केली, तर दोघं जण गर्दीचा फायदा घेत पसार झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

नांदेड शहरात 29 मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारतीची एक पथक तयार करुन नांदेड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग आणि गस्तकामी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते. यावेळी भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट नंबर एकच्या बाजूला बडपूरा येथे एर्टीगा (टीएस 17 जी 2045) गाडीत तेलंगणा राज्यातील पाच संशयित तरुण असल्याचे सांगितले.

तिघे जेरबंद, दोघे पसार

आपल्याकडे “एक बिलियन डॉलर्सची नोट (भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये) असल्याचे सांगून ते ही नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करण्याचे आमिष दाखवित असल्याची माहिती मिळाली. यावरून भारती यांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केले. मात्र, यात दोघे जण गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

पोलिसांनी महेश इल्लय्या वेल्लुटला (वय 30 वर्ष, रा. सर्यापूर, तालुका गांधारी, जिल्हा कामारेड्डी), नंदकिशोर गालरेड्डी देवारम (वय 42 वर्ष, रा. पोचंमागल्ली इब्राहिम पेठ बांसवाडा, तालुका बांसवाडा, जिल्हा कामारेड्डी) आणि आनंदराव आयात्रा गुंजी (वय 32 वर्ष, रा. नेकुनमबाबु जिल्हा प्रकासम, आंध्र प्रदेश – हल्ली मुक्काम गल्ली नंबर 1, बांसवाडा, कामारेडी) यांना अटक केली. मात्र दशरथ आणि त्याचा मित्र हे दोघेही पसार झाले.

मारहाण करुन पळायचा प्लॅन

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता एक बिलियन डॉलरची बनावट नोट असून ती लोकांना खरी म्हणून द्यायची आणि ते पैसे घेऊन आले की त्यांना मारहाण करुन, चाकूचा धाक दाखवून त्यांचे पैसे घेऊन पळून जायचे असा त्यांचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, एक चाकू, एर्टीगा गाडी असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध कलम 399 सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार हे करत आहेत.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे बेरोजगार, सुरु केला चक्क नोटांचा छापखाना, नाशिकमध्ये लाखो रुपये छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांदा व्यवसायिकाचा तळतळाट नडला, शंभरच्या 22 खोट्या नोट्या देणाऱ्या टोळीचा नोटांचा छापखाना, तिघांना बेड्या

VIDEO | वसईत दोन हजाराच्या नोटांचा खच, नागरिकांची गर्दी