इंदापूर (पुणे) : क्रिकेटच्या मैदानातून मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी सुरुच आहे. “बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. दिवाळीच्या तोंडावर दत्तात्रय भरणेंनी राजकीय फटाके फोडायला सुरुवात केलीय.
“इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, माझ्या रक्तातच काम आहे, मी खोटं-नाटं लबाडीचा धंदा करीत नाही. ज्या इंदापूरकरांमुळे मला मंत्रिपदाची खुर्ची मिळाली, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बॉल टप्प्यात आला की मी, सिक्स लावणार”. असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिलाय.
“मी छोटा पैलवान आहे. मात्र मला इतका सोपा समजू नका. डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. मला सगळं जमतं. भलेभले डाव कसे उलथवून लावायचे याची मला सर्व माहिती आहे” असे रोखठोक वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी बोलताना “मी पुण्यात शिकत असताना शिवाजी मराठा हायस्कूलला होतो. तिथे चिंचेची तालीम होती. तिथला मी पण पैलवान आहे. मी छोटा पैलवान आहे. शाळा, अभ्यास करत मी काहीवेळ पैलवानकी केलेली आहे. यासाठी मला घरून खुराख येत होता,” अशी आठवण भरणे यांनी सांगितली.
तसेच, “मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका, डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. मला सगळं जमतं. भलेभले डाव आले तर ते कसे उलथून टाकायचे ते मला माहीत असते. पण मात्र मी कधी बोलून दाखवत नाही. पैलवानकी बरोबर मी कबड्डीचादेखील खेळाडू आहे. त्यामुळे मला सगळे डाव जमतात,” असे भरणे म्हणाले. त्यांच्या या मिश्किल भाष्यानंतर सभेमध्ये एकच हशा पिकला. शेवटी उपस्थित पैलवानांना शुभेच्छा देत राज्यमंत्री पुढच्या नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.
हे ही वाचा :
मलिका आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल
समीर वानखेडेकडून प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा आरोप