सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.
कुडाळ माणगाव खोऱ्यातील गारवेली धबधबाही ओसंडून वाहत आहे.
डोंगर कपारीतून खळाळत येणारं पाणी आणि दुधासारखा फेसाळत असणारा धबधबा मन मोहून टाकत आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्यही सध्या खुलून आलं आहे.
माञ सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे गारवेली धबधब्यावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येत नसला तरी Tv9 च्या माध्यमातून येथील धबधब्याची काही दृश्य प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत….
कोकणात कोसळलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण, गारवेली धबधबा ओसांडून वाहू लागलाय@TV9Marathi pic.twitter.com/k6TTlfZaLS
— Akshay Adhav (@Adhav_Akshay1) July 18, 2021
रत्नागिरीकरांना सध्या पाऊस झोडपून काढतोय. या पावसामुळे नद्यांनी रौद्र रुप धारण केलंय. इथल्या बहुतांश नद्या या पात्र सोडून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी शिरलंय. नदीकाठी असणारी भातशेती पाण्याखाली गेलीय. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.
(Maharashtra Sindhudurg garweli Waterfall during rainy season)
हे ही वाचा :
Video : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी