कोल्हापूर : अर्ध्या महाराष्ट्राला तुफान पाऊस, महापूर आणि दरड दुर्घटनांनी उद्ध्वस्त केलं. जसजसा महापूर ओसरत आहे, तसतशी त्याची दाहकत समोर येत आहे. अनेक भागात नेते, अभिनेते दौरे करत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील (Deepali Sayed Bhudargad) ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली.
दीपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय”
संबंधित बातम्या
VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या
जितेंद्र आव्हाडांनी अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं खास गाणे