माझ्या घरावर धाड टाकत झडती घेऊन त्रास दिला, आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Jun 21, 2021 | 8:27 PM

"माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली व मला त्रास दिला गेला", असा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याने तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारवर केला आहे.

माझ्या घरावर धाड टाकत झडती घेऊन त्रास दिला, आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप
शंकरराव गडाख, मंत्री
Follow us on

उस्मानाबाद: “माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली व मला त्रास दिला गेला”, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याने तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारवर केला आहे. मृदा व जलसंधारण मंत्री शंककरराव गडाख यांनी उस्मानाबाद येथे त्यांना गेल्या सरकारच्या काळात सत्तेचा वापर करून दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल भावना व्यक्त केल्या. मागच्या 5 वर्षांच्या काळात जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हा माझ्या घरावर शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग करीत धाड टाकली गेली. शेतकरी आंदोलन प्रकरणात दाखल गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नाही. कोर्टात शेवटची तारीख असल्याने मी यापूर्वी नोटीस न मिळाल्याने हजर झालो नाही, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या 20 ते 25 जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली व झडती घेतली आणि मला त्रास दिला. सत्ता मिळवणे व राखणे करीता होणारे हे असे प्रकार दुर्दैवी असुन ते थांबले पाहिजेत असे शंकरराव गडाख यांनी सांगितले. (Minister Shankarrao Gadakh accused in previous government police harassed him blame on BJP)

भाजपवर नाव न घेता आरोप

गडाख हे अपक्ष निवडून आले होते त्यानंतर त्यांना जलसंधारण मंत्री शिवसेनेच्या कोट्यातून करण्यात आले. त्यानंतर गडाख यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला होता. त्यामुळे त्यावेळी आपण आता ज्या शिवसेना पक्षात आहात तोच पक्ष सत्तेत सहभागी असताना आपणास त्रास दिला गेला, असं विचारल्यावर त्यांनी भाजपचे नाव न घेता गंभीर आरोप केले.

त्यावेळी गृह खातं कुणाकडे?

शिवसेनेची सत्ता असताना गृह खाते कोणाकडे होते? खरी सत्ता कोण चालवत होते? या खोलात मी जाणार नाही. मात्र, मला त्रास दिला गेला ते चुकीचे होते. कोण हे प्रकार करत आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही असा आरोप गडाख यांनी भाजपवर केला. मंत्री गडाख यांनी उस्मानाबाद येथे शासकीय विश्रामगृह येथे त्यांना दिल्या गेलेल्या त्रासाचा अनुभव कथन केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते.

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना जे पत्र लिहले त्यात त्यांनी भावना व्यक्त केल्या,राजकारण करत असताना कुटुंबावर अनेक कटू प्रसंग येतात. राजकीय द्वेषातून अलीकडच्या काळात कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू झाले आहेत ते महाराष्ट्रला नवीन आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष सुरक्षित आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या प्रमुखांनी किमान समान कार्यक्रमवर आधारीत सरकार स्थापन केले आहे. राजकारणात ज्यांना त्रास झाला ते त्रासाबद्दल त्यांना आलेले अनुभव बोलत आहेत. सरनाईक यांनी भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता. त्याच अनुषंगाने मंत्री गडाख यांनी सुद्धा भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला.

संबंधित बातम्या:

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन मविआ सरकार अस्थिर करण्याचं भाजपचं षडयंत्र; नाना पटोलेंचा आरोप

आज सरकार येईल, उद्या सरकार येईल या आशेवर भाजपकडून रोज नव्या विषयांचा रतीब; मलिक यांची खोचक टीका

(Minister Shankarrao Gadakh accused in previous government police harassed him blame on BJP)