“‘लोक माझे सांगाती’मधून शरद पवार यांनी आपली नाही,शिवसेनेची बाजू मांडलेय”; भाजप नेत्याने राष्ट्रवादीला डिवचले

| Updated on: Apr 30, 2023 | 6:57 PM

जेव्हा हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं तेव्हा भाजप स्वतःच्या बळावर सत्ता मिळवू शकत नाही. तेव्हा चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत विचारांची हत्या उद्धव ठाकरे यांनी केल्याची जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

लोक माझे सांगातीमधून शरद पवार यांनी आपली नाही,शिवसेनेची बाजू मांडलेय; भाजप नेत्याने राष्ट्रवादीला डिवचले
Follow us on

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री पदावरुन पोस्टरबाजी सुरु आहे. त्यावरूनच आता महाविकास आघाडी आणि सत्ताधारी असे युद्ध रंगले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बारसू प्रकरणावरूनही जोरदार वाकयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. भावी मुख्यमंत्री पदासाठी पोस्टरबाजी सुरु असल्याने आता सत्ताधाऱ्यांकडूनही महाविकास आघाडी आणि आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली जात आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथनावरून सुधीर मुनगंटीवार यांनी जहरी टीका केली आहे.
लोक माझे सांगाती आत्मकथनावरून त्यांनी टीका करताना म्हटले आहे की, काही नेते त्यांच्या अनुभवावरून भाष्य करतात.

तर शरद पवार यांनी आपली आत्मकथा लोक माझे सांगाती मधून शिवसेनेची बाजू मांडली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपसोबत असलेली युती तोडत त्यांनी केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसत होती म्हणून ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

“लोक माझे सांगती” या स्वतः च्या राजकीय आत्मकथेतून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या जन्माचा प्रवास उलगडला आहे. त्यावर बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोचरी टीका केली आहे.

काही नेते त्यांच्या अनुभवावरून काही भाष्य करतात, भावना व्यक्त करतात. मात्र शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेतून शिवसेनेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून त्यांना याची आवश्यकता जाणवली असावी,असं म्हणतं मुनगंटीवार यांनी पवारांना डिवचले आहे. भाजपाने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केला आहे.

मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा शिवसेना आली तेव्हा भाजपसाठी असलेलं प्रेम,विचारांवर असलेलं प्रेम संपलं होतं अशीही टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांना केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसत होती असा चिमटाही सुधीर मुनगंटीवार यांनी काढला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी भाजप सोबत जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवल्या जात आहेत.

जेव्हा हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं तेव्हा भाजप स्वतःच्या बळावर सत्ता मिळवू शकत नाही. तेव्हा चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत विचारांची हत्या उद्धव ठाकरे यांनी केल्याची जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी आपले विचार मांडले होते. त्या काँग्रेसच्या विरोधात आपली लढाई अशीच सुरू राहिल अशी शपथ माता एकविरा मंदिरात आपल्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी दिली होती. त्या शपथेच्या भंग उद्धव ठाकरे यांनी केला अशी जहरी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात भाजप आणि शिवसेना, मविआचे राजकीय युद्ध रंगणार असल्याचे दिसून येत आहे.