नांदेड : देशात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे तर राज्यात महापुराचा हाहाकार… अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं योग्य नसल्याचं सांगत यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांसह असंख्य हितचिंतकांनी पुष्पगुच्छ हारतुरे यांवर खर्च न करता ती रक्कम अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस द्यावी असं आवाहन खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीने त्यांचा वाढदिवस एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. नांदेडचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
साठ वर्षांवरील महिलांच्या पेन्शनवाढीसाठी अर्ज भरुन घेणे, पत्रकारांसाठी एक लाखांचा अपघाती विमा, भजनी मंडळींना विविध साहित्याचं वाटप, गरोदर मातांना बेबी किटचे वाटप, विविध ठिकाणी वृक्षारोपन, नेत्रदान शिबीर, मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम, अशा एक ना अनेक कार्यक्रमाचं आयोजन करुन खासदार चिखलीकर यांच्या निरोगी आयुष्यासाठी भाजपने सेवा सप्ताहाचं आयोजन केलं आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात दरड कोसळून व पुराच्या पाण्याने 200 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्यामुळे त्या विभागात हाहाकार माजला आहे. कोविड महामारीचा उद्रेक सध्या काही प्रमाणात कमी झाला असला तरी कोरोना संपलेला नाही. महाराष्ट्रात निमार्ण झालेल्या या भयानक परिस्थितीमुळे सोमवार, दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह असंख्य हितचिंतकांनी पुष्पगुच्छ हारतुरे न आनता हारेतु-यावर होणार खर्च अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस भरीव मदत करावे. दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे मी दि. 2 ऑगस्ट रोजी नांदेडला येणार नाही. तरी कार्यकर्ते व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नांदेड व दिल्ली येथे येवू नये, असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना केलं आहे.
(Nanded MP Prataprao Patil Chikhlikar Birthday Service Week)
हे ही वाचा :
VIDEO | हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनी जल्लोष