नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात सलग दुसऱ्या दिवशी अपघात (Accident) झाल्याची घटना घडलीयं. चरणमाळ घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कांद्याने भरलेला ट्रक सटाण्याहून गुजरातकडे जात असताना चरणमाळ घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसलीतरी चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत. काल मालेगाव (Injured) सुरत बसचा याचठिकाणी अपघात झाला होता. या अपघातामध्ये वीस प्रवासांना किरकोळ दुखापत झाली होती आणि आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ट्रक (Truck) घाटात कोसळला आहे. आठवडाभरात हा तिसरा अपघात आहे. मात्र महामार्ग प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलतांना दिसत नाहीयं.
चरणमाळ घाटात दररोज होणाऱ्या अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुठली उपाययोजना करताना दिसून येत नाहीये. जणू काय मृत्यू तांडवाची वाट पाहत आहेत. या घाटात वर्षानुवर्ष अपघात आहेत तर महाराष्ट्र आणि गुजरात होऊन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहन ये-जा करतात. मात्र या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने कुठलाही दिशादर्शक फलक लावला नाहीयं. इतकेच नाही तर पुलांवर कठाळे देखील लावण्यात आले नाहीयं, यामुळे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे.
चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना केल्या. स्थानिक पोलीस अधिकारी बाळासाहेब भापकर यांनी चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांची बैठका घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करून लूट थांबवली असली तरी अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.
या ठिकाणी अपघात होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण तीव्र उतार आणि लागलीच मोठे वळण असल्याने नवीन चालकाला घाटाची कल्पना येत नाही आणि अपघात होतात. याठिकाणी घाटाच्या उतारावर एका बाजूला गतिरोधक बसवावे त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित होईल. 40 पेक्षा कमी वेगानेच वाहन घाटात चालवण्याबाबत देखील सूचना फलक लावाले आणि अपघात क्षेत्राचा फलक घाटात लावावेत. अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.