नगर: राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राज्यात बहुतांशी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दापोली नगरपंचायतीत शिवसेनेला दोन आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे आरिफ मेमन आणि नौशिन गिलगिले विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे खालिद रखांगे आणि मेहबूब तळघरकर हे विजयी झाले आहेत.
प्रभाग 1_ विमल संतु मंडलीक (शिवसेना)
प्रभाग 2_सागर चौधरी (भाजपा)
प्रभाग 3_प्रतीभा मनकर (भाजपा)
प्रभाग 4_इथेश कुंभार (भाजपा)
प्रभाग 5_ सोनाली नाईकवाडी (भाजपा)
प्रभाग 6_श्वेताली रूपवते (राष्ट्रवादी)
राष्ट्रवादीच्या- 4 उमेदवार विजयी
भाजपा च्या, 5 उमेदवार विजयी
राष्ट्रवादी- 4
भाजपा- 1
शिवसेना- 1
अपक्ष- 1
Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : नगरपंचायतीची रणधुमाळी, निकाल जाहीर होण्यास सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला https://t.co/JuNLlK8O6K#Election2022 | #NagarPanchayatElections2022 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2022
संबंधित बातम्या:
Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : आष्टी नगरपंचायत निवडणूक, भाजप 4 जागांवर विजयी
Nashik Crime | नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडले; दीड किलोची मूर्ती लंपास