रत्नागिरी : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे रत्नागिरीत बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा उद्या निघणार आहे. कशाला मोर्चा काढताहात. कोण चुकलं असेल झालं असेल. एवढा गवगवा त्याचा करायची काय गरज आहे. गवगवाचं करायचा आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा ही उपाधी कोणी दिली. रामदास स्वामी यांनी. तुकाराम महाराज यांनी. या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हटलं.
जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले. अनेक बादशाह झाले. मोठमोठे नेते झाले. लोकशाहीत अनेक नेते झाले. पण, जानता राजा ही पदवी पृध्वीच्या पाठीवर एकचं. छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून कुणालाही मिळालेली नाही आणि मिळणारही नाही, असंही शहाजीबापू पाटील म्हणाले.
चंद्र-सूर्य असेपर्यंत जानता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज. हे जगानं मान्य केलं आहे. जगाच्या इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नंबर एकची पदवी दिली. लंडनमध्ये दीडशे वर्षांपूर्वी जानता राजा ही पदवी बहाल केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
बदनाम करण्याचं कटकारस्थान आहेत. शिंदे-फडणवीसांनी केलेल्या कामाची नोंद घ्यावी लागणार आहे. एवढे जनसामान्याच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार आहे. चौफेर विचार करून रात्रंदिवस काम करणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे आहे.
१८ तास काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत. शिवसेनेचं झाडं केव्हा कोसळेल सांगता येत नव्हतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला. माणसं येतात. निघून जातात. मृत्यू अटळ आहे. मृत्यू कुणाला थांबणार नाही. संघटना अमर आहे, ती टिकली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतल्याचंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.