सांगली : सध्या लोकसभा आणि आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकांविषयी भाजपकडून आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. आज सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दौरा केला आहे. यावेळी त्यांनी भाजपविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करुन येणाऱ्या काळात लोकांना आता भाजपशिवाय पर्याय नाही असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या कामाविषयी बोलताना सध्या त्यांच्यासारखं काम करणारा देशात दुसरा नेता नाही असंही त्यांना यावेळी सांगितले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या 50 वर्षात भाजपाला कोणीही हरवू शकत नाही,
कारण भाजपा हे वर्तमान आहे आणि भाजप हेच भविष्य असल्याचेही केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार असल्याचा विश्वासही उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बोलून दाखवला
केशव प्रसाद मौर्य यांनी भाजपच्या आगामी काळातील राजकारणाविषयी आणि भाजपने केलेल्या कामाविषयी बोलताना त्यांनी भाजप लोकांमध्ये जाऊन कशा पद्धतीने काम करत आहे. तेही त्यांनी सांगितले.
त्यामुळेच येणाऱ्या पन्नास वर्षात भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. कारण आता भारतात भाजपा हे वर्तमान आहे आणि भाजप हेच भविष्य असल्यामुळे येथील लोकांनाही भाजपवर विश्वास दाखवला असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखवले.
भाजपचे जे विरोधक आहेत, ते आता घाबरले आहेत. कारण नरेंद्र मोदी हे चांगले काम करत आहेत. त्यामुळे विरोधक घाबरून गेले आहेत. त्यामुळे हे सर्व एकजूट होऊन नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी एकत्र येत आहेत.
मात्र नरेंद्र मोदी 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार आहेत. तर 2024 सालीही नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यावेळीही भाजपला बहुमत मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी दाखवून दिला आहे.
2014 च्या निवडणुकीच्या आधी सर्वजण म्हणत होते की, या देशाचं काही होणार नाही. कारण त्यावेळी हा देश काँग्रेसच्या वर्चस्वाखाली होता. त्यावेळी आपण 56 इंचच्या हातात सत्ता दिली.
हे भारतात होऊ शकते. कारण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वजण एकत्र येत आहेत मात्र मोदींचा करिष्मा हा अजूनही कायम असून आगामी काळातही तेच पंतप्रधान होतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.