चंद्रपूर – चंद्रपुरात उच्चपदस्थ वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यावर हनी ट्रॅपचं प्रकरण उघडकीस आलं. त्याची चित्रफीत दाखवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या अधिकाऱ्याला एका फ्लॅटवर बोलावून मैत्रिणी सोबतचे त्याचे व्हिडिओ चित्रित करण्यात आले. यातील काही भाग दाखवून डॉक्टरकडून तीन लाख वसूल केले. मात्र अधिक रक्कम कमावण्याच्या उद्देशाने तीन महिलांनी मिळून खंडणीचा कट रचला. डॉक्टर अधिकाऱ्याने पोलीस अधीक्षकांना तक्रार करत आपबिती सांगितली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चार पथके तयार करून सापळा रचला.
पाच लाख रुपयांचा चेक व तीस हजार रुपये रोख रक्कम घेताना आरोपीला अटक केली. एक पुरुष व तीन महिला आरोपींना अटक करत वैद्यकीय अधिकाऱ्याची हनीट्रॅपमधून सुटका केली.
फ्लॅटवर चित्रफित बनविली गेली. त्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला चित्रफित पाठवली. तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर महिलेनं दुसऱ्या महिलेला तीचं चित्रफित पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्लान केला. सादीक पठाणचाही यात सहभाग होता. त्याला अटक करण्यात आली.
नवीन सीम कार्ड खरेदी करून डॉक्टरला धमकी दिली जात होती. प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
त्यानंतर काल प्लान करून सादीक पठाणला संबंधित डॉक्टर भेटण्यासाठी गेला. ३० हजार रुपये आणि धनादेश दिला. त्यावेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली. यात तीन महिला आरोप आहेत. तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या प्रकरणामुळं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सक्रिय असलेल्या तिन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात एका पुरुष आरोपीचाही समावेश होता. त्यांच्याही मुसक्या पोलिसांना आवळल्या.